Share Market  Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारात गुंतवणूक करताय; तज्ज्ञांनी सूचवले हे 10 शेअर्स

Share Market Tips: काल मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये घसरण झाली.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: बुधवारी खराब जागतिक संकेतांनी बाजाराचा मूड गेला. त्यामुळे सेन्सेक्स-निफ्टी 1 टक्क्यांहून अधिक घसरले. सर्वाधिक विक्री पीएसई, मेटल आणि एनर्जी शेअर्समध्ये झाली. ऑटो, बँकिंग, रियल्टी शेअर्सवर दबाव निर्माण झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही घसरण झाली. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 677 अंकांनी घसरून 65783 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 207 अंकांनी घसरून 19527 वर बंद झाला. निफ्टी बँक 597 अंकांनी घसरून 44,996 वर बंद झाला. मिडकॅप 501 अंकांनी घसरून 37233 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

कंसोलिडेशनच्या रेंजच्या खाली घसरणे हे मंदीचे संकेत असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. निफ्टी त्याच्या 21 इएमएच्या खाली गेला आहे, ज्यामुळे मंदीची शक्यता निर्माण झाली आहे.

मोमेंटम इंडिकेटर आरएसआयही डाउनसाइड सिग्नल दाखवत आहे. आता निफ्टीला 19500 वर सपोर्ट दिसत आहे. निफ्टी 19,500 च्या खाली घसरल्यास आणखी घसरण शक्य आहे. वरच्या बाजूला असताना, निफ्टीसाठी 19,600 वर रझिस्टंस दिसून येतो.

तांत्रिक दृष्टिकोनातून, 20-दिवसांच्या एसएमए अर्थात सिंपल मूव्हिंग एव्हरेजचा सपोर्ट तुटल्यानंतर विक्रीचा दबाव वाढला आहे. बर्‍याच काळानंतर, निफ्टी 20-दिवसांच्या एसएमए खाली बंद झाला आहे आणि डेली चार्टवर एक लाँग बियरीश कँडल तयार केली आहे जी मोठ्या प्रमाणात नकारात्मक आहे.

आता निफ्टीला पहिला सपोर्ट 19,450 वर आहे. जर निफ्टी 19,450 च्या वर टिकून राहण्यात यशस्वी झाला, तर तो 19,580-19,600 च्या पातळीवर पुलबॅक रॅली दिसू शकेल, दुसरीकडे, जर निफ्टी 19450 च्या खाली घसरला तर ही घसरण 19,400-19,375 पर्यंत वाढू शकते.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • एनटीपीसी (NTPC)

  • एमफॅसिस (MPHASIS)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • पीएनबी (PNB)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT