Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: इंट्राडेमध्ये कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? तज्ञांनी सुचवले 10 शेअर्स

राहुल शेळके

Share Market Investment Tips: बुधवारी सलग चौथ्या दिवशी भारतीय बाजारात तेजी दिसून आली. निफ्टी 19600 च्या वर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 100.26 अंकांच्या अर्थात 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 65880.52 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 36.10 अंकांनी म्हणजेच 0.18 टक्क्यांनी वाढून 19611 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

इंट्रा-डे ट्रेडमध्ये बाजारात प्रचंड गोंधळ होता. मात्र दुपारनंतर निवडक शेअर्समधील खरेदीच्या जोरावर सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या ट्रेडिंग सत्रात वाढीसह बंद करण्यात यशस्वी झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले.

पण वाढत्या जागतिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास थोडा डळमळीत झाला आहे. यूएस बॉण्ड यील्ड आणि डॉलर इंडेक्समधील वाढ जागतिक बाजारपेठेत आणि भारतामध्ये अनिश्चितता निर्माण करत आहे. यामुळे पुन्हा एकदा एफआयआय भारतीय शेअर्सची विक्री करत आहेत.

तांत्रिक दृष्टिकोनातून, निफ्टीने 19500 च्या जवळ सपोर्ट घेतला आणि जोरदार पुनरागमन केले. एक चांगला इंट्राडे रिव्हर्सल फॉर्मेशन सध्याच्या पातळीपासून आणखी तेजीचेर दर्शवत आहे.

19550 ची पातळी व्यापाऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. निफ्टी 19550 च्या वर टिकून राहिल्यास 19650-19700 पर्यंत तेजी दिसून येईल. दुसरीकडे, 19550 च्या खाली गेल्यास विक्री वाढू शकते. मग निफ्टी 19500-19460 पर्यंत घसरेल.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • टाटा कंझ्युमर्स (TATACONSUM)

  • डिव्हिस लॅब (DIVISLAB)

  • भारती एअरटेल (BHARTIARTL)

  • एचडीएफसी बँक (HDFCBANK)

  • ब्रिटानिया (BRITANNIA)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's T20 World Cup: टीम इंडियाचा पहिल्याच सामन्यात पराभव; न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती

Rahul Gandhi यांच्या अडचणी वाढणार? पुणे विशेष न्यायालयाने समन्स बजावले, २३ ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश, प्रकरण काय?

Raj Thackeray On Zirwal : 'तुम्ही सत्ताधारी, संविधानिक पदावर बसलेले, तुम्ही निषेध कसले नोंदवताय?'; झिरवाळांच्या आंदोलनावर राज ठाकरे संतापले

Women's T20 WC: भारत-न्यूझीलंड सामन्यात ड्रामा! रनआऊटनंतरही केरला अंपायरने दिलं नॉटआऊट, हरमनप्रीतही वैतागती; नक्की काय झालं?

Western Railway वर 5 आणि 6 ऑक्टोबरला तब्बल 10 तासांचा Block, काही गाड्या रद्द, अनेक ट्रेन विलंबाने धावणार, पाहा संपूर्ण तपशील

SCROLL FOR NEXT