Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: ब्रिटानिया, पीएफसी, पॉलीकॅब 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष, इंट्राडेमध्ये होईल कमाई

Share Market Investment Tips: दोन दिवसांच्या घसरणीतून सावरत गुरुवारी अखेर सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद झाले.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: दोन दिवसांच्या घसरणीतून सावरत गुरुवारी अखेर सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद झाले. निफ्टी पुन्हा एकदा 19,100 च्या वर गेला आहे. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 489.57 अंकांच्या किंवा अर्थात 0.77 टक्क्यांच्या वाढीसह 64,080.90 वर आणि निफ्टी 144.10 अंकांच्या म्हणजेच 0.76 टक्क्यांच्या वाढीसह 19,133.30 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

दोन दिवसांच्या घसरणीनंतर गुरुवारी बाजार तेजीत राहिल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले. चांगल्या जागतिक संकेतांमुळे निफ्टीची सुरुवात वाढीसह झाली.

मात्र यानंतर तो एका रेंजमध्ये फिरत राहिला. बाजाराला ग्लोबल इंडेक्समधील वाढ, विशेषत: अमेरिकेत बाजाराला आलेल्या तेजीमुळे दिलासा मिळत आहे.

पण, 19200-19400 च्या झोनमध्ये निफ्टीला रझिस्टंस दिसत आहेत. अशा परिस्थितीत आपण संकटातून बाहेर पडलो असे म्हणणे घाईचे आहे. अशा परिस्थितीत, ट्रेडर्सने निवडक दर्जेदार स्टॉक्सचा विचार करावा असा सल्लाही त्यांनी दिला.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • ब्रिटानिया (BRITANNIA)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • पीएफसी (PFC)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • पॉलीकॅब (POLYCAB)

  • एमफॅसिस (MPHASIS)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावावर 10 लाखांचे बक्षिस; कोण आहे अनमोल बिश्नोई?

Diwali 2024: दिवाळीत घराची स्वच्छता करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, काम होईल सोपे

Nagpur East Assembly Election : भाजपच्या ‘कृष्णा’ला अजित पवार गटाच्या आभा यांचे आव्हान, आभा पांडेंकडून अर्ज दाखल

NCP Jalgaon Vidhansabha 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देवकर, खोडपे, खडसेंना उमेदवारी!

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT