Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारात कमाईची सुवर्णसंधी! 'या' शेअर्समधील गुंतवणूक ठरेल फायदेशीर

Share Market Tips: इस्राइल आणि पॅलेस्टाईन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली

राहुल शेळके

Share Market Investment Tips: इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धामुळे 9 ऑक्टोबरच्या सत्रात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली यामुळे निफ्टीमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. निर्देशांकांनी गेल्या दोन दिवसांतील सर्व नफा गमावला.

निफ्टी 50-दिवसांच्या EMA (19,560) खाली बंद झाला. दरम्यान येत्या भारतीय शेअर बाजारातील सत्रांमध्ये आणखी चढ उतार पाहायला मिळू शकतात. दरम्यान आजच्या शेअर मार्केटच्या सत्रात 19,450-19,500 हा झोन अत्यंत महत्वपूर्ण मानला जातोय.

तज्ज्ञांचे मते शेअर बाजाराने या लेव्हल तोडल्यास येत्या काळात निफ्टी 19,300 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. तर वरील बाजूला 19,600-19,700 ला लगेचच रेझिस्टन्स पाहायला मिळतोय.

सोमवारी निफ्टी 19,539 वर गॅप डाऊन होत उघडला. सोमवारच्या सत्राच्या सुरुवातीच्या तासांमध्ये काही प्रमाणात रिकव्हरी दिसून आली आणि ती दिवसभरात 19,589 पर्यंत पोहोचली. पण निफ्टीला 19,600 चा टप्पा पार करता आला नाही.

यानंतर निफ्टीला रिकव्हरीही सांभाळता आली नाही आणि 141 अंकांच्या घसरणीसह निफ्टी 19,512 वर बंद झाला. निफ्टीने डेली चार्टवर मंदीचा कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार केला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे नागराज शेट्टी यांच्या मते येत्या अल्पावधीत आणखी मंदी पाहायला मिळू शकते. शॉर्ट टर्ममध्ये निफ्टी 19,350-19,450 च्या वरील हॅमर पॅटर्नच्या खालच्या पातळीपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

विकली टाइमफ्रेमनुसार, गेल्या आठवड्यात तयार झालेला बुलिश हॅमर कॅन्डल पॅटर्न अजूनही कायम आहे. त्यामुळे निफ्टीत खालच्या स्तरावरून आणखी एक बाउन्स घेऊ शकतो.

मात्र त्याआधी निफ्टी अल्पावधीत 19,350-19,450 पर्यंतच्या स्तरांजवळ घसरण्याचीही शक्यता आहे. शेट्टी म्हणाले की 19,620 च्या लेव्हलवर लगेचचा रेझिस्टन्स दिसून येत आहे.

आज 'या' शेअर्सवर ठेवा नजर

  • डॉक्टर रेड्डी (DRREDDY)

  • एचसीएल टेक (HCLTECH)

  • टाटा कंझ्युमर्स (TATACONSUM)

  • ओएनजीसी (ONGC)

  • हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • बंधन बँक (BANDHANBNK)

  • पीएफसी (PFC)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारातील घसरण थांबणार का? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Sharad Pawar : सरकार बदलायचे लोकांनीच ठरवले आहे....शरद पवार यांचे प्रतिपादन; वरवंडमध्ये रमेश थोरात यांची प्रचार सभा

श्रीदेवीसोबत तुझं कट्टर वैर होतं? माधुरी दीक्षित स्पष्टच म्हणाली- ती एक चांगली अभिनेत्री होती पण मी...

SCROLL FOR NEXT