Share Market  Sakal
Share Market

Share Market Today: आज शेअर बाजारात जबरदस्त नफा कमवायचाय, ट्रेडिंग लिस्टमध्ये करा 'या' शेअर्सचा समावेश

Share Market Tips: ट्रेडर्सने फक्त निवडक शेअर्सचा विचार करावा असा तज्ञांचा सल्ला आहे

राहुल शेळके

Share Market Investment Tips: शुक्रवारी शेअर बाजार बाजार वाढीवर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 320 अंकांनी वाढून 65828 वर बंद झाला आणि निफ्टी 115 अंकांनी वाढून 19638 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी बँक 284 अंकांनी वाढून 44,585 वर बंद झाला. तर मिडकॅप 433 अंकांनी वाढून 40537 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

गुरुवारच्या घसरणीनंतर बाजाराने सावरण्याचा प्रयत्न केला आणि 0.50 टक्क्यांनी वाढ झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले. शेवटच्या तासात झालेल्या घसरणीमुळे नफा काहीसा कमी झाला. अशात निफ्टी 0.59 टक्क्यांच्या वाढीसह 19638.30 वर बंद झाला. फार्मा आणि मेटलमध्ये सर्वाधिक वाढ झाली. तर आयटीमध्ये घसरण झाली.

जोपर्यंत निफ्टी निर्णायकपणे 19750 ची पातळी परत मिळवत नाही, तोपर्यंत बाजारात तेजीचे येण्याबाबत निश्चितपणे काही सांगता येत नाही असे ते म्हणाले.

दरम्यान, सेक्टरल इंडेक्सवर संमिश्र कल दिसून आला. अशा परिस्थितीत दोन्ही बाजूंना ट्रेडसाठी संधी आहेत. ट्रेडर्सने केवळ निवडक स्टॉकचा विचार करावा असा सल्लाही त्यांनी दिला.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • एनटीपीसी (NTPC)

  • डॉ. रेड्डी (DRREDDY)

  • हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • एबीबीओटी इंडिया लिमिटेड (ABBOTINDIA)

  • पीएफसी (PFC)

  • एचडीएफसी असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (HDFCAMC)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT