Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारात इंट्राडेमध्ये कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? तज्ञांनी सुचवले 10 शेअर्स

राहुल शेळके

Share Market Investment Tips: मंगळवारी सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 316.31 अंकांनी अर्थात 0.48 टक्क्यांनी घसरून 65512.10 वर आणि निफ्टी 109.50 अंकांनी म्हणजेच 0.56 टक्क्यांनी घसरून 19,528.80 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

भारतीय बाजारांनी आठवड्याची सुरुवात मंद गतीने झाली असे केचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांनी सांगितले. दिवसभरात रिकव्हरीचे प्रयत्नही दिसून आले पण बाजार जास्त काळ वरच्या पातळीवर टिकू शकला नाही.

दिवसअखेर निफ्टी 109.55 अंकांच्या घसरणीसह 19528.75 वर बंद झाला. निफ्टीने मंगळवारी बियरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार केला आहे. पण सध्या ते 19450 च्या मजबूत सपोर्ट लेव्हलच्या जवळ आहे.

जर निफ्टी या पातळीच्या खाली बंद झाला तर तो 19200 पर्यंत खाली येऊ शकतो. यासाठी 19630 वर रझिस्टंस आहे. त्याच वेळी, निफ्टीला तेजी मिळवायची असेल तर त्याला 19730 च्या वर क्लोझिंग द्यावा लागेल.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • ओएनजीसी (ONGC)

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • मारुती (MARUTI)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • डॉ. रेड्डी (DRREDDY)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • ए यू बँक (AUBANK)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Disqualification Case: शिवसेना- राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी अखेर मिळाला मुहूर्त; या तारखेला होणार सुनावणी

Latest Marathi News Updates : स्थानिकांनी घातला धारावी पोलीस ठाण्याला घेराव

Cha.Sambhajinagar: मराठवाड्यात काँग्रेस असणार मोठा भाऊ? या जागांवर केला दावा

Tirumala Tirupati Laddu: 'तिरुपती'च्या लाडूमध्ये आढळले जनावराची चरबी अन् माशांचं तेल; 'या' पद्धतीने ओळखा तूपाची शुद्धता

Bigg Boss Marathi 5 Voting Trends: सुरजला जान्हवीने दिली टक्कर तर 'या सदस्याला मिळालेत सगळ्यात कमी वोट्स; कोण होणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT