Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'हे' शेअर्स असणार तेजीत, पहा आजची ट्रेडिंग लिस्ट

Share Market Investment Tips: मूडीजने अमेरिकेची रेटिंग कमी केल्याचा परिणाम गुंतवणूकदारांवर झालेला पाहायला मिळाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: कमजोर ग्लोबल संकेतांमुळे निफ्टी आणि सेंसेक्स सोमवारच्या सत्रात मंदीत बंद झालेले पाहायला मिळाले. यूएस बॉण्ड यिल्डमध्ये झालेली वाढ, डॉलरमधील मजबुती आणि क्रेडिट एजन्सी मूडीजतर्फे अमेरिकेची रेटिंग कमी केल्यानंतर त्याचा परिणाम गुंतवणूकदारांवर झालेला पाहायला मिळाला.

एकीकडे सेंसेक्स जवळजवळ 350 अंक मंदीत बंद झाला, तर निफ्टी 19450 च्या खाली घसरलेला पाहायला मिळाला. दरम्यान, मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक मंदीपासून काहीसे बचावले आणि आणि निर्देशांक सपाट बंद झालेले पाहायला मिळाले.

आज कशी असेल बाजाराची चाल?

सोमवारच्या सत्रात NSE वर एकूण 2,469 शेअर्सची विक्री झाली, त्यापैकी 933 शेअर्स वधारले तर 1,440 शेअर्समध्ये विक्री दिसून आली. दरम्यान, 96 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. सोमवारच्या सत्रात 104 शेअर्स अपर सर्किटला आले.

त्याच वेळी 54 शेअर्स लोअर सर्किटला धडकले. NSE वर, 146 शेअर्सनी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला तर 9 शेअर्सनी 52 आठवड्यांची नीचांकी पातळी गाठली.

LKP सिक्युरिटीजच्या रूपक डे यांच्या मते, निफ्टीला 19500 च्या लेव्हल वर राहण्यासाठी संघर्ष करावा लागला. सोमवारच्या सत्रात निफ्टीला विक्रीच्या दबावाचा सामना करावा लागला , म्हणूनच निफ्टी 19400 पर्यंत पडलेला पाहायला मिळाला.

दरम्यान, शॉर्ट टर्ममध्ये निफ्टीत कमजोरी राहण्याची शक्यता असल्याचेही ते सांगतात. निफ्टीसाठी 19300 लेव्हलवर सपोर्ट, तर वरच्या बाजूला 19550 वर रेझिस्टन्स पाहायला मिळतोय.

आज 'या' शेअर्सवर ठेवा नजर

  • पीएफसी - PFC

  • एयू बँक - AUBANK

  • फेडरल बँक - FEDERALBNK

  • हिंद पेट्रो - HINDPETRO

  • कमिन्स इंडिया - CUMMINSIND

  • एसबीआय लाईफ - SBILIFE

  • बजाज फायनान्स - BAJFINANCE

  • ग्रासिम - GRASIM

  • इन्फोसिस - INFY

  • नेस्ले इंडिया - NESTLEIND

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

0.05 सेकंद, 2 सेंटीमीटर... Trump यांच्यावर गोळीबार; अमेरिकेच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट कसा ठरला?

Supreme Court : तुमच्याकडे कारचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर... सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अनेकांना होणार फायदा

लग्नाच्या १३ वर्षांनंतरही मुल का नाही? सतत एकच प्रश्न विचारणाऱ्यांना प्रिया बापटचं रोखठोक उत्तर, म्हणाली- मी आता..

'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! कांटे की टक्कर अन् काटाजोड लढती; कोल्हापुरातील 'या' दहा मतदारसंघांत काय स्थिती?

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

SCROLL FOR NEXT