Share Market Investment Tips: मंगळवारी सलग सातव्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वाढीसह बंद झाले. आयटी क्षेत्र वगळता बाजारात चौफेर खरेदी दिसून आली. त्यामुळे निफ्टी 17700 च्या वर बंद झाला.
व्यवसायाच्या शेवटी, सेन्सेक्स 311.21 अंकांच्या म्हणजेच 0.52 टक्क्यांच्या वाढीसह 60157.72 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 98.30 अंकांच्या म्हणजेच 0.56 टक्क्यांच्या वाढीसह 17722.30 च्या पातळीवर बंद झाला.
आज कशी असेल बाजाराची स्थिती?
आशियाई आणि युरोपीय बाजारातील वाढीमुळे भारतीय बाजारांनाही चालना मिळाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. तांत्रिकदृष्ट्या, इंट्राडे टाइम फ्रेमवर, मजबूत पुलबॅक रॅलीनंतर बाजार हायर हाय हायर लो फॉर्मेशन कायम राखून आहे.
तसेच ते 50-दिवसांच्या एसएमएवर (सिंपल मूव्हिंग एव्हरेज) ट्रेड करत आहे, जे सकारात्मक संकेत आहे.
ट्रेंड फॉलो करणाऱ्या ट्रेडर्ससाठी 17,650 पातळी हा मोठा सपोर्ट आहे. हा सपोर्ट कायम राहिल्यास निफ्टी 17800-17835 पर्यंत जाऊ शकतो.
दुसरीकडे, जर निफ्टी 17650 च्या खाली घसरला तर एक तीव्र इंट्राडे करेक्शन दिसू शकते आणि निफ्टी 17550-17500 च्या दिशेने जाताना दिसू शकतो.
गेल्या 7 ट्रेडिंग दिवसांत निफ्टी आदल्या दिवसाच्या नीचांकी पातळीच्या खाली गेलेला नसल्याचे शेअर खानचे जतिन गेडिया यांनी सागितले. जे एक अतिशय सकारात्मक तेजीचे चिन्ह आहे. आता निफ्टीला 17655 –17650 वर महत्त्वाचा सपोर्ट दिसत आहे.
तर, 17700 - 17730 वर रझिस्टंस आहे. निफ्टी अजूनही तेजीचे संकेत देत आहे. निफ्टी शॉर्ट टर्ममध्ये 17800 ची पातळी पाहू शकतो.
आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?
कोटक बँक (KOTAKBANK)
जेएसडब्ल्यू (JSWSTEEL)
आयशर मोटर्स (EICHERMOT)
बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)
टाटा स्टील (TATASTEEL)
भारतीय कंटेनर निगम (CONCOR)
ऍस्ट्रल (ASTRAL)
झिंदाल स्टील (JINDALSTEL)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)
ए यू बँक (AUBANK)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.