Share Market  Sakal
Share Market

Share Market Investment Tips: शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा प्लॅन करताय? हे 10 शेअर्स देतील जबरदस्त रिटर्न

मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार वाढीसह बंद झाला.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार वाढीसह बंद झाला. सकारात्मक देशांतर्गत डेटा, चांगले जागतिक संकेत आणि यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर गोठवण्याच्या अपेक्षेमुळे ही तेजी दिसून आली.

सेन्सेक्स 418.45 अंकांनी अर्थात 0.67 टक्क्यांनी वाढून 63,143.16 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 114.70 अंकांनी म्हणजेच 0.62 टक्क्यांनी वाढून 18716.20 वर बंद झाला

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी मंगळवारी वाढीसह उघडला आणि दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ बंद झाला. डेली चार्टवर लक्षात येते की निफ्टीने पुन्हा अपट्रेंड सुरू केला आहे. मंगळवारी त्याने 18530-18500 चा सपोर्ट कायम ठेवला.

सध्याचा अपट्रेंड 18800 आणि नंतर 18889 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मोमेंटम इंडिकेटर डेली आणि टाईम फ्रेमवर वेगवेगळे सिग्नल देत आहे.

पण प्राईस ऍक्शन तेजी संकेत देत आहे. 8630-18620 झोनमध्ये सपोर्ट दिसत आहे. तर 18778 – 18800 च्या झोनमध्ये रेझिस्टन्स दिसून येत आहे.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • टाटा कंझ्युमर (TATACONSUM)

  • सिप्ला (CIPLA)

  • आयटीसी (ITC)

  • टायटन (TITAN)

  • एशियन पेंट्स (ASIANPAINT)

  • ट्रेंट (TRENT)

  • लॉरस लॅब (LAURUSLABS)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT