Share Market Investment Tips Esakal
Share Market

Share Market Investment Tips: बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

बाजारात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण दिसून आली.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: बाजारात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण दिसून आली. निफ्टी 18500 च्या खाली घसरला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 193.70 अंकांनी अर्थात 0.31 ने घसरून 62428.54 वर बंद झाला.

त्याच वेळी, निफ्टी 46.60 अंकांच्या म्हणजेच 0.25 टक्क्यांच्या घसरणीसह 18487.80 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी एका रेंजमध्ये फिरत राहिल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. आता जोपर्यंत निफ्टी इंडेक्स18500 ची पातळी ओलांडत नाही तोपर्यंत बाजाराचा सेंटीमेंट नेगिटीव्ह असेल अशी शक्यता आहे.

निफ्टी 18500 परत मिळवू शकला नाही तर बाजारात आणखी करेक्शन दिसून येईल. निफ्टीला 18300-18350 जवळ सपोर्ट आणि 18650 च्या आसपास रझिस्टंस दिसत आहे.

निफ्टी 18150 वर ट्रेंड सपोर्टसह तेजीमध्ये असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे सहज अग्रवाल म्हणाले. जोपर्यंत 18150 ची पातळी तुटत नाही तोपर्यंत निफ्टी 18800-19000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

शॉर्ट टर्ममध्ये निफ्टीला 18400-18450 वर सपोर्ट दिसत आहे. 18150 ची ट्रेंड लेव्हल मोडली तर मार्केटमधील अस्थिरता वाढेल.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • कोटक बँक (KOTAKBANK)

  • भारती एअरटेल (BHARTIARTL)

  • एसबीआय लाईफ (SBILIFE)

  • एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

  • टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • झिंदाल स्टील (JINDALSTEL)

  • ए यू बँक (AUBANK)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT