Share Market Sakal
Share Market

Share Market : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

आयटी, मेटल, रियल्टी आणि फायनांशियल शेअर्सच्या जोरावर बाजाराने कमबॅक केले.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips : शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार वाढीसह बंद झाला. आयटी, मेटल, रियल्टी आणि फायनांशियल शेअर्सच्या जोरावर बाजाराने कमबॅक केले. शेवटी सेन्सेक्स 355.06 अंकांनी अर्थात 0.62 टक्क्यांनी वाढून 57,989.90 वर बंद झाला.

त्याच वेळी, निफ्टी 114.40 अंकांनी म्हणजेच 0.67 टक्क्यांनी वाढला आणि 17100 वर बंद झाला. बीएसईचा मिडकॅप इंडेक्स 0.3 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. त्याच वेळी, बीएसईचा स्मॉलकॅप इंडेक्स 0.7 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. (Share Market Investment Tips Which 10 shares will be perform today 20 March 2023 before the market opens know details)

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

शुक्रवार निफ्टीसाठी अतिशय अस्थिर होता असे शेअरखानचे जतीन गेडिया म्हणाले. दोन्ही बाजूंनी खूप चढ-उतारानंतर, शेवटी पॉझिटीव्ह नोटवर बंद झाला. निफ्टीला शुक्रवारी 17150 - 17200 च्या झोनमध्ये रझिस्टंसचा सामना करावा लागला.

आता निफ्टीला 16850 वर सपोर्ट आहे. येत्या काही ट्रेडिंग सत्रांमध्ये निफ्टी त्याच्या रझिस्टंस आणि सपोर्ट झोनमध्ये कंसोलिडेट होण्याची आशा आहे.

चांगल्या जागतिक संकेतांमुळे शुक्रवारी बाजारात दिलासादायक तेजी दिसल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी यूएस फेड आता आपल्या कठोर भूमिकेत काही नरमाई आणेल अशीही बाजाराला अपेक्षा आहे.

अमेरिकेच्या बँकिंग क्षेत्राची चिंताही थोडी कमी झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि चिनी अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याच्या आशेमुळे मेटल सेक्टरमध्ये रिकव्हरी झाली आहे.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • एचसीएल टेक (HCLTECH)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)

  • युनायटेड फॉस्पोरस लिमिटेड (UPL)

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • झिंदाल स्टील (JINDALSTEL)

  • एल अँड टी सर्व्हिसेस लिमिटेड (LTTS)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • भारतफोर्ज (BHARATFORG)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT