Share Market Investment Tips: कॅपिटल गुड्स वगळता सर्व क्षेत्रांमध्ये सोमवारी खरेदी दिसून आली. यामुळे 12 जून रोजी भारतीय इक्विटी मार्केटने दोन दिवसांची घसरण मोडली.
बाजार शेवटी किरकोळ वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स 99.08 अंकांनी अर्थात 0.16% वाढला. 62,724.71 वर बंद झाला. निफ्टी 38.10 अंकांनी म्हणजेच 0.21% वाढून 18,601.50 वर बंद झाला.
आज कशी असेल बाजाराची स्थिती?
मजबूत जागतिक बाजाराच्या पाठिंब्याने सकारात्मक नोटेवर उघडल्याने भारतीय बाजार मर्यादित नफ्यासह व्यवहार करत होते असे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले.
या आठवड्याच्या शेवटी यूएस FOMC बैठकीपूर्वी गुंतवणूकदार आशावादी दिसत होते. फेड यावेळी दर वाढीवर रोखू शकते असे संकेत आहेत. 18550 चा स्तर व्यापार्यांसाठी सपोर्ट म्हणून काम करेल.
ज्याच्या वर इंडेक्स 18650-18700 पर्यंत जाऊ शकतो. दुसरीकडे, 18550 तुटल्यानंतरच नवीन विक्री शक्य आहे. असे झाल्यास, इंडेक्स आणखी खाली 18500-18450 पर्यंत सरकू शकतो.
आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?
बीपीसीएल (BPCL)
एचसीएल टेक (HCLTECH)
इन्फोसिस (INFY)
एनटीपीसी (NTPC)
अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)
हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)
श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)
एम फॅसिस (MPHASIS)
पर्सिस्टंट (PERSISTENT)
व्होल्टास (VOLTAS)
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.