share market Mahatma Gandhi Sakal
Share Market

Gandhi Jayanti 2024: बंदे मे था दम! शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांनी शिकावं बापूंचं मनी मॅनेजमेंट

राहुल शेळके

Gandhi Jayanti 2024: आज देश गांधी जयंती साजरी करत आहे. महात्मा गांधींच्या आयुष्यात शिस्त खूप महत्त्वाची होती. ते प्रत्येक काम शिस्तीने करायचे. लोकांना शेअर बाजारातून पैसे कमवायचे असतात पण अनेक वेळा नुकसान होते. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे शिस्तीचा अभाव. तुम्हालाही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचे असेल तर गांधीजींचे हे शब्द नक्की लक्षात ठेवा.

गांधीजींची शिकवण केवळ दैनंदिन आयुष्यासाठी महत्त्वाची नाही, तर गुंतवणुकीसंदर्भातील त्यांच्या विचारांतूनही आपण खूप काही शिकू शकतो. गांधीजींच्या आदर्शांमध्ये गुंतवणुकीचा फंडा लपलेला आहे. त्यांच्याकडून तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ मजबूत करायला शिकू शकता. यासोबतच बाजारात काय करू नये हेही त्यांच्याकडून शिकू शकता.

जग बदलण्यासाठी निघू नका, स्वतःला बदला

बाजाराबाबत सर्वांचे म्हणणे असते की बाजार खराब आहे. मी घेतलेला गुंतवणूतकीचा निर्णय वाईट आहे असे कोणीही म्हणत नाही. जिथे बाजारात जायचे आहे तिथे तो जाईल. जर मार्केट खराब आहे आणि मी शेअर्स विकायचे ठरवले, तर मार्केट खराब कसे असणार.

त्यामुळे बाजार बदलण्याचा विचार कधीही करू नका. स्वतःला बदला. मार्केटनुसार तुमची रणनीती बदला. ट्रेंडला तुमचा मित्र बनवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चुकीचा निर्णय घेतला असेल तर चूक मान्य करा आणि स्टॉपलॉस सेट करा.

कठीण प्रसंगी हार मानू नका

बाजाराच्या संदर्भात पाहिले तर, तेजीच्या बाजारात प्रत्येकजण खरेदीदार असतो. निफ्टी 20,000 वर आहे, त्यामुळे प्रत्येकजण खरेदीदार आहे. सर्वात वाईट बाजारपेठांमध्ये सर्वोत्तम गुंतवणूक केली जाते. शेअर्स खरेदी केल्यानंतर किंमत सहसा घसरते. म्हणजेच, तुम्हाला वाईट काळात पैसे गुंतवावे लागतील आणि चांगल्या वेळेची वाट पहावी लागेल.

भीती तुमचा शत्रू आहे

हा बाजार फक्त लोभ आणि भीतीवर चालतो. लोभामुळे कमी, भीतीमुळे जास्त. लोभामुळे काय होईल, तुम्ही वरच्या बाजूने खरेदी कराल पण खालच्या बाजूला विकल्यावर तुमचे नुकसान होईल. याचा अर्थ तुम्हाला तुमचे ब्लड प्रेशर आणि तुमची भीती नियंत्रणात ठेवावी लागेल.

संयम नसेल तर पराभव निश्चित

अधीर झालेले गुंतवणूकदार बाजारातील पैसे नक्कीच गमावतील. जर तुमच्याकडे शिस्त आणि संयम नसेल तर तुम्हाला नुकसान होणारच. चांगले शेअर्स खरेदी करा आणि दीर्घकाळ टिकून राहा, तरच मोठी कमाई होईल. तरच संपत्ती निर्माण होईल.

कठोर परिश्रम करा

हे बाजाराबाबत नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. विशेषतः ही ओळ गुंतवणूकदारांना लागू होते. ट्रेडिंग हे पूर्णवेळ काम आहे अर्धवेळ नाही. जर तुम्हाला व्यापार करायचा असेल तर तो व्यवस्थित करा. शेअर बाजारातील सर्व गोष्टी शिकून घ्या.

लोभ भरून काढता येत नाही

लोभाचा अंत नाही. बाजाराच्या दृष्टिकोनातून समजून घेतल्यास, प्रत्येकाला लगेच पैसे हवे असतात. 21 दिवसांत पैसे दुप्पट होतात. हे कोणत्याही बाजारात होणार नाही आणि होत नाही. हे एकदा घडले असेल तर ते नेहमी होत नाही. अनपेक्षित कमाईची अपेक्षा करू नका. लोभ जितका जास्त तितका धोका जास्त असतो हे लक्षात ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Rane: संपूर्ण ताकद त्यांच्या मागे उभी करू; निलेश राणेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत सामंत यांची प्रतिक्रिया

Vinesh Phogat: 'पंतप्रधान मोदींशी फोनवर बोलण्यास मी नकार दिला कारण...', विनेशचा खळबळजनक दावा

Dasara Melava 2024 : दसरा मेळाव्यासाठी गावागावात जनजागृती करणार; फुलंब्रीत मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्याकडून अधिकृतरीत्या जनसुराज्य या राजकीय पक्षाचे लाँचिंग; पहिल्या अध्यक्षांबाबत जाणून घ्या

Shardiya Navratri 2024 : नवरात्रौत्सवाची सुरूवात होणार, जाणून घ्या शास्त्रोक्त पद्धतीने घटस्थापना कशी करावी?

SCROLL FOR NEXT