Share Market  Sakal
Share Market

Stock Market Crash: सेन्सेक्स-निफ्टी सलग पाचव्या दिवशी घसरणीसह बंद; गुंतवणूकदारांचे 3.70 लाख कोटी रुपयांचे नुकसान

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 4 October 2024: शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. आठवडाभर झालेल्या विक्रीमुळे बाजारात दबाव होता. सेन्सेक्स-निफ्टी कालच्या नीचांकी पातळीवर घसरला. सेन्सेक्स 800 अंकांच्या घसरणीसह बंद झाला तर निफ्टी 200 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. बँक निफ्टीमध्ये जवळपास 300 अंकांची घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही घसरण झाली. आयटी निर्देशांकात किंचित वाढ दिसून आली.

दिवसभर बाजारात प्रचंड अस्थिरता होती. सकाळी घसरणीसह बाजार उघडला पण दिवसभरात सेन्सेक्स 870 अंकांनी तर निफ्टी 235 अंकांनी वाढला. पण व्यवहार संपण्यापूर्वीच बाजारात पुन्हा जोरदार प्रॉफिट बुकींग झाले आणि सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकावरून 1835 पर्यंत घसरला आणि निफ्टी 520 अंकांनी घसरला.

Share Market Closing

एफएमसीजी, बँकिंग आणि ऊर्जा शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बाजारात ही घसरण झाली आहे. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 808 अंकांच्या घसरणीसह 81,688 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 200 अंकांच्या घसरणीसह 25,049 अंकांवर बंद झाला.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात आयटी शेअर्स वगळता इतर सर्व क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली आहे. बँकिंग, ऑटो, एफएमसीजी, फार्मा, मेटल्स, एनर्जी, हेल्थकेअर, मीडिया, रिअल इस्टेट, कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये आजही घसरण दिसून आली आहे.

Share Market Closing
कोणते शेअर्स वाढले?

बीएसईवर एकूण 4054 शेअर्सचे व्यवहार झाले, त्यापैकी 1532 शेअर्स वाढीसह बंद झाले आणि 2386 शेअर्स घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 8 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 22 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 13 शेअर्स वाढीसह आणि 37 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

वाढत्या शेअर्समध्ये इन्फोसिस 1.33 टक्के, टेक महिंद्रा 0.83 टक्के, टाटा मोटर्स 0.51 टक्के, ॲक्सिस बँक 0.50 टक्के, टीसीएस 0.42 टक्के, एसबीआय 0.28 टक्के, एचसीएल टेक 0.72 टक्के वाढीसह बंद झाले.

घसरलेल्या शेअर्समध्ये महिंद्रा अँड महिंद्रा 3.58 टक्क्यांच्या घसरणीसह, बजाज फायनान्स 3.01 टक्क्यांच्या घसरणीसह, नेस्ले 2.85 टक्क्यांच्या घसरणीसह, एशियन पेंट्स 2.49 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

BSE SENSEX
गुंतवणूकदारांचे 3.70 लाख कोटी रुपयांचे नुकसान

आज बाजारातील विक्रीमुळे गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. बीएसईवर शेअर्सचे मार्केट कॅप घसरले आहे आणि ते 461.05 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे.

जे मागील सत्रात 465.05 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 3.70 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या आठवड्यात भारतीय शेअर बाजाराचे मार्केट कॅप 17 लाख कोटी रुपयांनी घसरले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Encounter: छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये देशातील सर्वात मोठी नक्षलवादी चकमक! आतापर्यंत 30 नक्षलवादी ठार; शस्त्रसाठा जप्त

NIAचे महासंचालक ते दहशतवाद्यांचा कर्दनकाळ अशी ओळख; आता हे निवृत्त IPS अधिकारी BCCI मध्ये सांभाळणार मोठी जबाबदारी

Womens T-20 world cup स्पर्धेपूर्वी रोहित शर्माने घेतली भारतीय खेळाडूंची भेट, हरमनप्रीत, स्मृती, जेमिमासोबतचा Video Viral

Prasad Oak : "स्ट्रगलच्या काळात आली रस्त्यावर झोपण्याची वेळ" प्रसादने सांगितला तो कठीण काळ , बायकोचे ट्रोलर्सला खडेबोल

Latest Marathi News Live Updates: राहुल गांधींना पुणे कोर्टाचे समन्स

SCROLL FOR NEXT