Share Market Closing Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात प्रॉफिट बुकिंग; सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला, निफ्टी 26,200च्या खाली

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 27 September 2024: आठवडाभरात शेअर बाजारात विक्रमी वाढ झाल्यानंतर, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी व्यापार सत्राच्या उत्तरार्धात प्रॉफिट बुकिंग झाले. सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला. त्याच वेळी निफ्टी 26,200 च्या खाली आला.

बँक निफ्टीही 500 हून अधिक अंकांनी घसरले आणि मिड आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही घसरण झाली. बँकिंग आणि एफएमसीजी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 264 अंकांनी घसरून 85,571 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 37 अंकांनी घसरून 26,179 अंकांवर बंद झाला.

आज सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 15 कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात तर 15 कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात बंद झाले. त्याचप्रमाणे निफ्टी 50 पैकी 29 कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले आणि 20 कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात बंद झाले आणि एका कंपनीच्या शेअरमध्ये कोणताही बदल झाला नाही.

Share Market Closing

सन फार्माच्या शेअर्समध्ये मोठी वाढ

सेन्सेक्ससाठी अग्रगण्य फार्मा कंपनी सन फार्माचे शेअर्स सर्वाधिक 2.67 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. याशिवाय टायटनच्या शेअर्समध्ये 1.58 टक्के, एनटीपीसीच्या शेअरमध्ये 1.51 टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 1.50 टक्के, एचसीएल टेकच्या शेअरमध्ये 1.37 टक्के, बजाज फिनसर्व्हच्या शेअरमध्ये 1.10 टक्के वाढ नोंदवण्यात आली.

Share Market Closing

कोणते शेअर्स घसरले?

दुसरीकडे, पॉवरग्रीडच्या शेअर्समध्ये आज सर्वाधिक 2.75 टक्क्यांची घसरण झाली. आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये 1.80 टक्के, भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये 1.69 टक्के, कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये 1.39 टक्के, लार्सन अँड टुब्रोच्या शेअर्समध्ये 1.37 टक्के आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये 1.08 टक्के घसरण दिसून आली.

BSE SENSEX

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात ऑटो, आयटी, फार्मा, मेटल्स, एनर्जी, कमोडिटी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले. तर बँकिंग, एफएमसीजी, मीडिया आणि रिअल इस्टेट शेअर्स घसरले. आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही प्रॉफिट बुकिंग झाली.

मार्केट कॅपमध्ये वाढ

आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी जरी घसरले असले तरी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. बीएसईवर शेअर्सचे मार्केट कॅप 477.97 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 477.17 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. आजच्या व्यवहारात मार्केट कॅपमध्ये 80,000 कोटी रुपयांची वाढ दिसून आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : बांगलादेशी पॉर्न स्टार महिलेचा उल्हासनगरातील हिललाईन पोलिसांकडून पर्दाफाश

Tarak Mehta Ka Ooltah Chashmah : "मला शो सोडायचाय म्ह्णून निर्माते त्रास देतायत" ; तारक मेहता...मधील सोनुने केला आरोप

Latest Maharashtra News Updates: २८ सप्टेंबरला भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

Viral: कुलरच्या हवेवरून वऱ्हाड्यांमध्ये वाद, रागात वधूने थेट लग्नच मोडलं, नंतर वरानं जे केलं त्यानं...

BJP Government: सनातन धर्म रक्षणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना होणार? राष्ट्रपतींकडे केली मागणी

SCROLL FOR NEXT