Share Market  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला, विप्रो, टेक महिंद्रामध्ये जोरदार खरेदी

Share Market Closing Today: गेल्या दोन आठवड्यांच्या चढ-उतारानंतर या आठवड्यात देशांतर्गत शेअर बाजारात काही प्रमाणात स्थिरता येण्याची अपेक्षा गुंतवणूकदार आणि व्यापारी व्यक्त करत होते. दरम्यान, आज सोमवारी (14 ऑक्टोबर) अखेर शेअर बाजाराने जोरदार पुनरागमन केले आहे.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 14 October 2024: गेल्या दोन आठवड्यांच्या चढ-उतारानंतर या आठवड्यात देशांतर्गत शेअर बाजारात काही प्रमाणात स्थिरता येण्याची अपेक्षा गुंतवणूकदार आणि व्यापारी व्यक्त करत होते. दरम्यान, आज सोमवारी (14 ऑक्टोबर) अखेर शेअर बाजाराने जोरदार पुनरागमन केले आहे.

सेन्सेक्स-निफ्टीने मोठी झेप घेतली. सेन्सेक्स सुमारे 600 अंकांच्या वाढीसह बंद झाला आणि निफ्टीही सुमारे 200 अंकांच्या वाढीसह बंद झाला. शेवटी निफ्टी 163 अंकांनी वाढून 25,127 वर बंद झाला. सेन्सेक्स 591 अंकांनी वाढून 81,973 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 644 अंकांनी वाढून 51,816 वर बंद झाला.

Share Market Closing

दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्सने 700 अंकांनी झेप घेत 82,000 च्या पातळीपर्यंत मजल मारली. त्याच वेळी, निफ्टी सुमारे 200 अंकांनी वाढून 25,100 च्या वर गेला होता. विप्रो, टेक महिंद्रा, एचडीएफसी लाईफ, एचडीएफसी बँक आणि एलटी हे शेअर्स NSE वर सर्वाधिक वाढले. त्याचवेळी ओएनजीसी, मारुती, टाटा स्टील, अदानी एंटरप्रायझेस, बजाज फायनान्समध्ये मोठी घसरण झाली.

Share Market Closing
क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवसायात बँकिंग आयटी शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. निफ्टीचा बँकिंग निर्देशांक 1.26 टक्के किंवा 644 अंकांच्या वाढीसह बंद झाला. तर निफ्टी आयटी निर्देशांक 537 अंकांच्या वाढीसह बंद झाला. याशिवाय फार्मा, एफएमसीजी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि ऑटो सेक्टरचे शेअर्स तेजीसह बंद झाले. घसरणाऱ्या स्टॉकमध्ये मेटल, मिडिया यांचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही वाढीसह बंद झाले.

BSE SENSEX
गुंतवणूकदारांनी 1.49 लाख कोटी कमावले

BSE वर कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप आज 14 ऑक्टोबर रोजी वाढून 463.76 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवार, 11 ऑक्टोबर रोजी 462.27 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.49 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.49 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर आज वाढीसह बंद होणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त होती. एक्सचेंजमध्ये आज एकूण 4,195 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 2,066 शेअर्स वाढीसह बंद झाले. 1,977 शेअर्सध्ये घसरण दिसून आली.

तर 152 शेअर्स कोणतीही हालचाल न करता फ्लॅट बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 249 शेअर्सनी त्यांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 26 शेअर्सनी त्यांच्या नवीन 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

Farmer : भरपाईपासून ५० हजार शेतकरी वंचित,गतवर्षी रब्बी हंगामात झाले होते पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT