Share Market Today Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; पण किंचित वाढीमुळे सेन्सेक्स-निफ्टीने गाठला विक्रमी उच्चांक

Share Market Today: गुरुवारी (26 सप्टेंबर) भारतीय शेअर बाजारासाठी जागतिक बाजारातून चांगले संकेत मिळत आहेत. आज निफ्टीने 26,000 चा टप्पा ओलांडला होता. परंतु अमेरिकन बाजारांमध्ये अनेक दिवसांच्या विक्रमी तेजीनंतर बुधवारी नफा बुकिंग झाले.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 26 September 2024: गुरुवारी (26 सप्टेंबर) भारतीय शेअर बाजारासाठी जागतिक बाजारातून चांगले संकेत मिळत आहेत. आज निफ्टीने 26,000 चा टप्पा ओलांडला होता. परंतु अमेरिकन बाजारांमध्ये अनेक दिवसांच्या विक्रमी तेजीनंतर बुधवारी नफा बुकिंग झाले. त्यामुळे देशांतर्गत बाजारातही काही प्रमाणात नफा बुकिंग दिसून येण्याची शक्यता आहे.

याशिवाय, आज सकाळी जागतिक ट्रिगर सकारात्मक आहेत. आशियाई बाजार जोरदारपणे व्यवहार करत आहेत आणि निक्केई देखील 2% म्हणजे सुमारे 700 अंकांनी वाढला आहे. GIFT निफ्टी 75 अंकांनी 26,075 वर तर डाऊ फ्युचर्स 50 अंकांनी वर होता. बीएसईचा सेन्सेक्स आज 2.30 अंकांनी घसरला आणि 85,167 च्या पातळीवर व्यवहार सुरू झाला, NSE चा निफ्टी 26,005 च्या पातळीवर 1.25 अंकांनी वाढताना दिसत आहे.

Share Market Opening

कोणते शेअर्स वाढले?

बीएसई सेन्सेक्सच्या 16 शेअर्समध्ये वाढ झाली असून मारुती, टाटा मोटर्स, नेस्ले आणि आयटीसीच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून येत आहे. NSE निफ्टीमध्ये 50 पैकी 28 शेअर्समध्ये वाढ होत आहे आणि 22 शेअर्समध्ये घसरण होत आहे.

Share Market Opening

सुरुवातीच्या व्यापारात, मारुती सुझुकी, एसबीआय लाइफ, नेस्ले इंडिया, एलटीआय माइंड ट्री, विप्रो, एचसीएल टेक सारख्या शेअर्समध्ये निफ्टी 50 इंडेक्सवरून खरेदी होत आहे. बँकिंग शेअर्ससह, आयटी, फार्मा आणि काही वाहन शेअर्स या रॅलीमध्ये आघाडीवर आहेत.

एफआयआय बाजारात खरेदी करत आहेत आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून लार्ज कॅप शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसून येत आहे.

BSE SENSEX

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे झाल्यास, सुरुवातीच्या व्यापारात निफ्टी आयटीमध्ये सर्वाधिक 0.88 टक्के वाढ दिसून आली. याशिवाय निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये 0.02 टक्के, निफ्टी एफएमसीजीमध्ये 0.46 टक्के, निफ्टी फार्मामध्ये 0.04 टक्के, निफ्टी रियल्टीमध्ये 0.12 टक्के, निफ्टी हेल्थकेअरमध्ये 0.05 टक्के वाढ दिसून आली.

त्याच वेळी निफ्टी मिडस्मॉल हेल्थकेअरमध्ये 0.24 टक्के, निफ्टी ऑइल अँड गॅसमध्ये 0.63 टक्के, निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये 0.84 टक्के, निफ्टी प्रायव्हेट बँकेत 0.06 टक्के, निफ्टी पीएसयू बँकेत 0.52 टक्के, निफ्टी 11 टक्के, निफ्टी ऑटो 0.08 टक्क्यांनी घसरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT