Share Market Opening eSakal
Share Market

Share Market Opening : ग्रीन मार्कमध्ये उघडला शेअर बाजार; सेन्सेक्स-निफ्टी दोन्हींमध्ये तेजी

आज सकाळी सेन्सेक्स १४६.४२ अंकांनी वर जाऊन, ६६,५३१ अंकांवर उघडला.

Sudesh

मंगळवारी (२५ जुलै) शेअर मार्केट उघडताच ग्रीन मार्कमध्ये दिसून आला. सेन्सेक्स-निफ्टी दोन्हीमध्ये तेजी दिसत आहे. सोबतच, बँक निफ्टीच्या शेअर्समध्येही तेजी दिसून येत आहे.

आज सकाळी सेन्सेक्स १४६.४२ अंकांनी वर जाऊन, ६६,५३१ अंकांवर उघडला. तर, निफ्टीदेखील ५७ अंकांनी वर जाऊन १९,७२९.३५ अंकांवर सुरू झालं. बँक निफ्टीदेखील ४६ हजारांच्या वर आहे.

सेन्सेक्समधील ३० पैकी १८ शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत, तर १२ शेअर्स रेड मार्कमध्ये आहेत. दुसरीकडे निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी ३१ शेअर्स ग्रीन झोनमध्ये दिसत आहेत, तर १८ शेअर्स रेड मार्कवर आहेत. (Share Market Opening Bell)

सेक्टोरल इंडेक्स

आज एपएमसीजी आणि आयटी शेअर्स वगळता इतर सर्व क्षेत्रांमध्ये तेजी दिसून येत आहे. मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये १.२९ टक्के वाढ दिसून येत आहे. त्यानंतर रिअल्टी शेअर्स हे ०.७८ टक्के तेजीत आहेत. ऑटोच्या शेअर्समध्येही ०.७६ टक्के वाढ दिसून येत आहे. तर, ऑईल अँड गॅसचे शेअर्स ०.५० टक्के तेजीत आहेत. आयटीसीचा शेअर २.४३ टक्क्यांनी कोसळला असून हा आजचा टॉप लूजर आहे.

कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्समधील अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, एमअँडएम, पॉवर ग्रिड, बजाज फायनान्स, एनटीपीसी, इंडस इंड बँक, भारती एअरटेल, सन फार्मा, नेस्ले, टायटन, एसबीआय आणि रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स तेजीत आहेत.

तर टेक महिंद्रा, एशियन पेंट्स, इन्फोसिस, अ‍ॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस, एसबीआय, मारुती, एलअँडटी, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक आणि विप्रोच्या शेअर्समध्ये मंदी दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT