Share Market  Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 65,854 वर उघडला, कोणत्या शेअर्समध्ये झाली वाढ?

Share Market Opening: गुरुवारी शेअर बाजार सपाट उघडला.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 7 September 2023:

गुरुवारी शेअर बाजार सपाट उघडला. संमिश्र जागतिक संकेतांचा परिणाम बाजारावर दिसून आला. प्रमुख बाजार निर्देशांक सुस्त आहेत. BSE सेन्सेक्स किंचित घसरणीसह 65,854 च्या जवळ व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे निफ्टी निर्देशांक देखील 19,576 व्यवहार करत होता.

टाटा कंझ्युमर 2 टक्क्यांनी घसरला

हल्दीराममधील भागभांडवल विकत घेतल्याच्या प्रसारमाध्यमांच्या वृत्तांवर स्पष्टीकरण दिल्यानंतर, टाटा कंझ्युमरचा शेअर सुमारे 2 टक्क्यांनी घसरला आहे, जो निफ्टीमध्येही टॉप लूझर आहे.

निफ्टीमध्ये डॉ. रेड्डीजचे शेअर्स 1.25 टक्क्यांनी वाढले आहेत. याआधी बुधवारी भारतीय बाजार तेजीसह बंद झाला होता. BSE सेन्सेक्स 100 अंकांनी वाढून 65880 वर बंद झाला.

Share Market Opening 7 September 2023 (S&P BSE SENSEX)

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

बाजारात तेजी दाखवणाऱ्या शेअर्सबद्दल बोलायचे तर इंडियाबुल्स रिअल इस्टेट, एमएमटीसी लिमिटेड, एनबीसीसी इंडिया या कंपन्यांच्या शेअर्सनी गुरुवारी सुरुवातीच्या व्यापारात तेजीसह व्यवहार करत होते. शेअर बाजारात तेजी दाखवणाऱ्या शेअर्समध्ये फेडरल बँक, मारुती सुझुकीचा समावेश होता.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण

गुरुवारी अदानी समूहाच्या कंपन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, सुरुवातीच्या व्यवहारात अदानी समूहाच्या सात कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. बँकिंग शेअर्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, बजाज फायनान्स, पिडीलाइट इंडस्ट्रीज, होम फर्स्ट फायनान्स, महिंद्रा हॉलिडेज आणि जेनसोल इंजिनिअरिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण होती.

गुरुवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याचा भाव एका आठवड्याच्या नीचांकी पातळीवर होता. अमेरिकन अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्याने डॉलर मजबूत झाला, तर जपानी चलन 10 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT