शुक्रवारी शेअर बाजार सपाट उघडला. चांगल्या जागतिक संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक किंचित वाढीसह उघडले. BSE सेन्सेक्स 30 अंकांच्या किंचित वाढीसह 66,000 च्या पुढे व्यवहार करत आहे. निफ्टीही 17 अंकांनी वाढून 19,000 च्या वर व्यवहार करत होता.
बाजारात फार्मा, मेटल आणि सरकारी बँकिंग शेअर्समध्ये खरेदी होताना दिसत आहे. सिप्ला शेअर्स निफ्टीमध्ये सुमारे 2.5% च्या वाढीसह व्यवहार करत आहेत.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 35 शेअर्सनी वाढ नोंदवली तर 15 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. निफ्टीमध्ये सिप्ला, डिव्हीज लॅब, डॉ. रेड्डीज, ग्रासिम आणि एनटीपीसीचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते तर बजाज ऑटो, टीसीएस, बीपीसीएल, टायटन आणि अपोलो हॉस्पिटलचे शेअर्स घसरले होते.
शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तेजीत उघडला आणि न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी आणि रतन इंडिया एंटरप्रायझेससह रतन इंडिया पॉवरचे शेअर्स मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या टॉप गेनर शेअर्सच्या यादीत होते.
आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये संमिश्र कल दिसून येत आहे. आशियाबद्दल बोलायचे झाले तर GIFT NIFTY फ्लॅट आहे तर Nikkei 225 0.78 टक्क्यांनी वाढला आहे.
स्ट्रेट्स टाइम्समध्ये 0.38 टक्के घसरण आहे तर हँगसेंग देखील 1.54 टक्क्यांनी घसरला आहे. तैवान वेटेडमध्ये 0.04 टक्के वाढ, कोस्पीमध्ये 0.42 टक्के आणि शांघाय कंपोझिटमध्ये 0.43 टक्के घट झाली आहे.
सुरुवातीच्या व्यवहारात, अदानी समूहाच्या पाच कंपन्यांचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते, तर एसीसी लिमिटेड, अदानी ग्रीन एनर्जी, अंबुजा सिमेंट आणि अदानी विल्मार यांचे शेअर्स घसरले होते.
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणार्या शेअर्समध्ये स्टोव्ह क्राफ्ट, ओम इन्फ्रा, पटेल इंजिनीअरिंग, महिंद्रा अँड महिंद्रा, एक्साइड इंडस्ट्रीज, गती लिमिटेड, देवयानी इंटरनॅशनल आणि कामधेनू लिमिटेडचे शेअर तेजीत होते तर फायनान्शिअल आणि टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवली जात होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.