Share Market Opening Latest Update 10 October 2023: मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. चांगल्या जागतिक संकेतांमुळे, प्रमुख बाजार निर्देशांक तेजीत आहेत. BSE सेन्सेक्सने सुमारे 300 अंकांच्या वाढीसह 65,800 चा स्तर ओलांडला आहे. त्याचप्रमाणे निफ्टीतही 90 अंकांची वाढ झाली असून तो 19,00 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.
पीएसयू बँक, ऑटो, मेटल शेअर्स चमकले
शेअर बाजारात मेटल, ऑटो आणि सरकारी बँकिंग क्षेत्राचे शेअर्स तेजीत आहेत. NSE वर, PSU बँक आणि मेटल इंडेक्स प्रत्येकी 1% च्या तेजीसह व्यवहार करत आहेत. निफ्टीमध्ये टाटा मोटर्स, हिरो मोटो आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स 2 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.
क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती
क्षेत्रीय निर्देशांकामध्ये आज निफ्टी आयटी, फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रातही घसरण दिसून येत आहे. याशिवाय आज तेल आणि गॅस, कंझ्युमर ड्युरेबल, रियल्टी, प्रायव्हेट बँक, पीएसयू बँक, मीडिया, मेटल, एफएमसीजी, ऑटो आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली आहे.
कोणत्या शेअर्समध्ये तेजी?
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, अदानी समूहाच्या 9 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. अदानी पोर्ट्सचे शेअर्स तीन टक्क्यांच्या वाढीसह उघडले तर अदानी पॉवर, अदानी विल्मार, एनडीटीव्ही, अदानी एंटरप्रायझेस, अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी, एसीसी लिमिटेड आणि अंबुजा सिमेंटचे शेअर्स वधारले.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात बजाज फायनान्स, ओएनजीसी यांसारख्या कंपन्यांचे शेअर्सही तेजीत होते. जर आपण गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांबद्दल बोललो तर पटेल इंजिनिअरिंगचा शेअर सुमारे 3 टक्के, स्टोव्ह क्राफ्ट 2 टक्के, जिओ फायनान्शियल 1.43 टक्के, देवयानी इंटरनॅशनल आणि गति लिमिटेडचा शेअर सुमारे 1 टक्क्यांनी वाढला आहे.
आज टाटा मोटर्सचे शेअर्स 2.13 टक्क्यांच्या वाढीसह 630 रुपयांच्या पातळीवर आहेत. याशिवाय एमअँडएम, मारुती, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, कोटक बँक, अॅक्सिस बँक, टायटन, आयटीसी, एलटी, टाटा स्टील, रिलायन्स, एचडीएफसी बँक, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, जेएसडब्ल्यू स्टील, विप्रो, इंडसइंड बँक यांचे शेअर्स वाढत आहेत.
कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
सेन्सेक्समधील टॉप-30 शेअर्सच्या यादीत टीसीएस, एशियन पेंट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस आणि सन फार्मा यांच्या शेअर्समध्ये आज घसरण दिसून येत आहे.
जागतिक बाजारात तेजी दिसून आली
डाऊ जोन्स 0.6 टक्क्यांच्या वाढीसह दिसत आहे. त्याचवेळी Nasdaq 0.4 टक्क्यांनी वाढताना दिसत आहे. याशिवाय आशियाई बाजारांमध्ये निक्केई 2 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.