Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today Hero MotoCorp up over 2 percent 30 November 2023  Sakal
Share Market

Share Market Opening: सलग तिसऱ्या दिवशी बाजार तेजीत; सेन्सेक्स 67,000 पार, कोणते शेअर्स वधारले?

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 30 November 2023: चांगल्या जागतिक संकेतांमुळे शेअर बाजार तेजीसह उघडला. बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह उघडले. बीएसई सेन्सेक्सने 60 अंकांची उसळी घेतली आणि 66,900 च्या वर व्यापार करत होता, ज्याने इंट्राडे 67000 च्या पातळीला देखील स्पर्श केला.

त्याचप्रमाणे निफ्टी देखील 20,100 च्या वर व्यवहार करत आहे. बँकिंग, ऑटो आणि फार्मा सेक्टरमध्ये बाजारात उत्साह आहे, तर आयटी आणि मेटल सेक्टरमध्ये विक्री दिसून येत आहे.

सेन्सेक्सच्या शेअर्सची स्थिती

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 18 शेअर्समध्ये वाढ आणि 12 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. अल्ट्राटेक सिमेंटचा शेअर 2.05 टक्क्यांनी वाढला आहे. M&M 1.91 टक्क्यांनी तर अॅक्सिस बँक 1.52 टक्क्यांनी वर आहे. विप्रो 0.95 टक्के आणि एचयूएल 0.85 टक्क्यांनी वधारले आहे.

निफ्टीच्या शेअर्सची स्थिती

50 निफ्टी शेअर्सपैकी 35 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत तर 15 शेअर्समध्ये घसरण होत आहे. Hero MotoCorp अजूनही निफ्टीच्या टॉप गेनर्समध्ये अव्वल आहे आणि 3.16 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. अल्ट्राटेक सिमेंट 1.78 टक्क्यांनी वधारले आहे. BPCL चे शेअर्स 1.66 टक्क्यांनी, SBI Life 1.45 टक्क्यांनी आणि M&M 1.24 टक्क्यांनी चांगल्या नफ्यासह व्यवहार करत आहेत.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात अदानी समूहाच्या सर्व नऊ सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते. अदानी टोटल गॅसचा शेअर 3.44 टक्के घसरला होता, अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर तीन टक्क्यांनी घसरला तर एसीसी लिमिटेडचा शेअर 0.26 टक्के घसरला होता.

गुरुवारी सुरुवातीच्या व्यापारात मल्टीबॅगर शेअर्समध्ये, ओम इन्फ्राचा शेअर 1.51 टक्क्यांनी वाढला तर स्टोव्ह क्राफ्ट, महिंद्रा अँड महिंद्रा, कामधेनू लिमिटेड, युनि पार्ट्स इंडिया लिमिटेड, देवयानी इंटरनॅशनल आणि टाटा मोटर्सचे शेअर्स किरकोळ वाढले. एक्साइड इंडस्ट्रीज, गती लिमिटेड, जिओ फायनान्शिअल आणि पटेल इंजिनीअरिंगचे शेअर्स घसरले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miss Universe India 2024: मिस युनिव्हर्स इंडिया ठरली गुजरातची सुंदरी, कोण आहे रिया सिंघा?

Maharashtra Weather Updates: पुढील तीन दिवस पावसाचा धुमाकूळ, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणत अलर्ट?

Mumbai Traffic Updates: मुंबईतील अनेक रस्ते 23 सप्टेंबर रोजी बंद; जाणून घ्या पर्यायी मार्गांविषयी सर्वकाही

Amit Shaha Nashik Dura : व्हिआयपी बंदोबस्तासाठी पोलिस सज्ज; केंद्रीय गृहमंत्री 25 ला नाशिकमध्ये

Bigg Boss Marathi S5 : बिग बॉस मराठीच्या घरातून अरबाज पटेल बाहेर ! प्रेक्षक म्हणाले...

SCROLL FOR NEXT