Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today Hindalco, Tata Steel among top blue-chip gainers, rise up to 2 percent 21 November 2023  Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजारात 2 दिवसानंतर तेजी; सेन्सेक्स 250 अंकांनी वर, कोणते शेअर्स वाढले?

Share Market Opening: मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 21 November 2023:

मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. चांगल्या जागतिक संकेतानंतर प्रमुख निर्देशांक तेजीसह उघडले. BSE सेन्सेक्स सुमारे 210 अंकांनी वाढून 65870 वर पोहोचला आहे. निफ्टीनेही 65 अंकांची उसळी घेत 19750 चा टप्पा पार केला आहे. मेटल, आयटी आणि बँकिंग क्षेत्रात वाढ होत आहे. निफ्टीमध्ये हिंदाल्कोचा शेअर 2 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.

सेन्सेक्सच्या शेअर्सची स्थिती

सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 23 शेअर्सचे भाव वधारत आहेत आणि फक्त 7 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. सर्वाधिक वाढणाऱ्या शेअर्सपैकी JSW स्टील 1.16 टक्क्यांनी वधारला आहे. टाटा स्टील 1.08 टक्के आणि एचडीएफसी बँक 0.80 टक्क्यांनी तेजीत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज 0.69 टक्क्यांनी तर इन्फोसिस 0.67 टक्क्यांनी वर आहे. HCL Tech 0.62 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.

निफ्टीच्या शेअर्सची स्थिती

निफ्टी शेअर्सपैकी 37 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत आणि 13 शेअर्स घसरणीसह आहेत. सर्वाधिक नफा मिळवणाऱ्यांमध्ये अदानी एंटरप्रायझेसने सर्वाधिक 2 टक्क्यांनी झेप घेतली आहे. Hindalco 1.85 टक्क्यांनी आणि JSW स्टील 1.32 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. टाटा स्टील 1.21 टक्क्यांनी तर बजाज फायनान्स 1.02 टक्क्यांनी वर आहे.

आशियाई बाजारात संमिश्र कल

आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये संमिश्र कल दिसून येत आहे. आशियाबद्दल बोलायचे झाले तर, GIFT NIFTY मध्ये 0.01 टक्क्यांनी घसरला आहे. Nikkei 225 0.15 टक्के आणि स्ट्रेट टाइम्स 0.17 टक्के खाली आहे. हँग सेंग सुमारे 0.91 टक्क्यांनी तेजीत आहे. तैवान वेटेड 1.06 टक्के आणि कोस्पी सुमारे 0.92 टक्के वाढ दर्शवत आहे, तर शांघाय कंपोझिट देखील 0.40 टक्क्यांनी तेजीत आहे.

आजच्या व्यवहारात मल्टीबॅगर परतावा देणार्‍या शेअर्समध्ये पटेल इंजिनीअरिंगचे शेअर्स पाच टक्क्यांनी वाढले होते. ओम इन्फ्रा, जिओ फायनान्शिअल, कामधेनू, देवयानी इंटरनॅशनल, टाटा मोटर्स, एक्साइड इंडस्ट्रीज, महिंद्रा अँड महिंद्रा, गती लिमिटेड, युनी पार्ट्स आणि स्टोव्ह क्राफ्टचे शेअर्सही वाढले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh Attack: अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांनी व्यक्त केली 'ही' भीती, म्हणाले- राज्यातील कायदा सुव्यवस्थाच...

Nashik Traffic Route: मतमोजणीसाठी शहरातील वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेचे नियोजन

Google Crome Sell : क्रोम ब्राऊजर विकून टाका! US मधून गुगलच्या मालकांना आला फोन, नेमकं प्रकरण काय?

Eye Care Tips : दुषित हवेचा डोळ्यांवर होतोय थेट परिणाम, डोळ्यांची काळजी कशी घ्यायची, तज्ज्ञांकडून जाणून घ्या

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : छ. संभाजीनगरमध्ये विधानसभा निवडणुक प्रचार, उमेदवारांच्या दुचाकी फेरीमुळे मार्ग खोळंबले

SCROLL FOR NEXT