Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today Infosys falls, HCL Tech gains 13 October 2023  Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच! सेन्सेक्स 66,000 च्या खाली, आयटी-बँकिंग क्षेत्रात जोरदार विक्री

Share Market Opening: आशियाई बाजारातही किंचीत घसरण होत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 13 October 2023: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारातील व्यवहार मंदावण्याची चिन्हे आहेत. बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरणीसह उघडले. कारण जागतिक बाजारातून मिळणारे संकेत नकारात्मक आहेत.

BSE सेन्सेक्स 300 हून अधिक अंकांनी घसरला आणि 66,100 च्या पातळीवर पोहोचला. निफ्टीही 80 अंकांनी घसरून 19,700 च्या पातळीवर गेला आहे. GIFT निफ्टी 150 अंकांच्या घसरणीसह 19700 च्या खाली घसरला आहे. आशियाई बाजारातही किंचीत घसरण होत आहे.

आयटी शेअर्समुळे बाजारावर दबाव

दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात सर्वाधिक घसरले आहेत. त्यात 2.50 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. विप्रो दीड टक्क्यांनी खाली आहे. टेक महिंद्राही एक टक्क्याहून अधिक घसरला आहे. दुसरीकडे, एचसीएल टेक सुमारे 2.50 टक्क्यांनी तेजीत आहे. टीसीएस या सर्वात मोठ्या आयटी कंपनीचा शेअर किंचित वाढला आहे.

Share Market Opening Latest Update 13 October 2023 (S&P BSE SENSEX)

कोणत्या शेअर्समध्ये तेजी?

सेन्सेक्समधील 30 शेअर्सच्या निर्देशांकांपैकी 19 शेअर्स घसरणीसह तर 11 शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत. एचसीएल टेक, टीसीएस, मारुती, बजाज फायनान्स, इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये वाढ झाली. सुरुवातीच्या व्यापारात व्होडाफोन आयडिया 2.94% वर होता. याशिवाय एमएमटीसी, इन्फिबीम अव्हेन्यू, गेल इंडिया, आयटीआय शेअर्स वधारत होते.

कोणत्या शेअर्समध्ये घसरण?

सुरुवातीच्या व्यापारात, रिलायन्स इंडस्ट्रीज NSE वर 2.98% च्या घसरणीसह व्यवहार करत होता. त्याच वेळी, अदानी एंटरप्रायझेसचा शेअर देखील 0.40% च्या घसरणीसह व्यवहार करत होता. याशिवाय हॅथवे केबल्सचा शेअर घसरणीसह व्यवहार करत होता.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये, निफ्टी आयटी, निफ्टी ऑटो, निफ्टी बँक, निफ्टी फायनान्समध्ये घसरण दिसून आली. तर निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी, निफ्टी मिडकॅप 100 वाढीसह व्यवहार करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North Assembly Election 2024 Results : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मोहोळमध्ये राजू खरे 29528 मतांनी आघाडीवर

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT