Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today IT drags, metal, power gain 12 October 2023  Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; सेन्सेक्स 66,500 च्या जवळ, आयटी क्षेत्रावर दबाव

Share Market Opening: शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सपाट व्यवहार करत आहेत.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 12 October 2023: आज शेअर बाजाराची सुस्त सुरुवात झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक सपाट व्यवहार करत आहेत. BSE सेन्सेक्स 70 अंकांच्या किंचित वाढीसह 66,500 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे निफ्टीही 20 अंकांनी वर आहे. निर्देशांक 19,800 च्या पुढे गेला आहे. IT क्षेत्र बाजारावर दबाव आणत आहे.

कोणत्या शेअर्समध्ये तेजी?

गुरुवारी, शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यापारात, एस्टर डीएमच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.

व्होडाफोन आयडिया, इन्फिबीम अॅव्हेन्यूज, इंडियन ओव्हरसीज बँक, येस बँक, यूको बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र, पटेल इंजिनीअरिंग, ओम इन्फ्रा, कामधेनू लिमिटेड, जिओ फायनान्शियल, युनी पार्ट्स, स्टोव्ह क्राफ्ट, गती लिमिटेड या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, गौतम अदानी समूहाच्या सर्व नऊ कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

Share Market Opening 12 October 2023 (S&P BSE SENSEX)

कोणत्या शेअर्समध्ये घसरण?

आज सुरुवातीच्या व्यवहारात आयटी शेअर्सवर खूप दबाव आहे. TCS चा शेअर सर्वात जास्त 1 टक्क्यांनी घसरला आहे. कंपनीचे सप्टेंबर तिमाहीचे निकाल बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमी असल्याने आज शेअर्समध्ये घसरण झाली.

टेक महिंद्रा आणि एचसीएल टेक सारखे आयटी शेअर्स देखील घसरणीसह व्यवहार करत आहेत. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 12 शेअर्स घसरले आहेत. एसबीआय, टाटा मोटर्स, अॅक्सिस बँक यांसारखे शेअर्सही बाजारावर नियंत्रण ठेवत आहेत.

काय सांगतात तज्ञ?

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे डॉ सीके विजय कुमार म्हणाले की, जगभरात होत असलेल्या सकारात्मक घडामोडींमुळे भारताच्या शेअर बाजारातही वाढ होऊ शकते.

डॉलर इंडेक्समधील घसरणीचा कल आणि यूएस बॉण्डच्या उत्पन्नात झालेली घसरण, यासोबतच कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे आणि परदेशी गुंतवणूकदारांची विक्री थांबली आहे, ही शेअर बाजारासाठी सकारात्मक बातमी आहे आणि यामुळे शेअर बाजारातील बाजारात वाढ नोंदवली जाऊ शकते.

जागतिक बाजारात तेजी

जागतिक बाजारात तेजीचा कल आहे. बुधवारी अमेरिकन बाजार तेजीत होते. डाऊ जोन्स सरासरी 0.19 टक्क्यांनी वाढला. तर NASDAQ कंपोझिट इंडेक्समध्ये 0.71 टक्के आणि S&P 500 मध्ये 0.43 टक्के तेजी होती. आजच्या व्यवहारात आशियाई बाजारही तेजीत राहिले. जपानचा निक्की 1.21 टक्के नफ्यात आहे. हाँगकाँगचा हँग सेंग सुमारे 1.85 टक्क्यांनी वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT