Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today Mid Cap 100 and Small Cap 100 opened positive 27 October 2023 Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजारातील 6 दिवसांच्या घसरणीला ब्रेक; सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला

Share Market Opening: सेन्सेक्स सुमारे 300 अंकांच्या वाढीसह 63,400 च्या वर व्यवहार करत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 27 October 2023: आज शेअर बाजारात दिवसाची सुरुवात चांगली झाली आहे. बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह उघडले. BSE सेन्सेक्स सुमारे 300 अंकांच्या वाढीसह 63,400 च्या वर व्यवहार करत आहे.

निफ्टीनेही 70 अंकांची वाढ करत 18,900 चा टप्पा पार केला आहे. बँकिंग आणि मेटल क्षेत्रे बाजाराच्या वाढीमध्ये आघाडीवर आहेत. बजाज ऑटो, इन्फोसिस, हिंदाल्को हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले आहेत.

सेन्सेक्सच्या शेअर्सची स्थिती

बीएसई सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 27 शेअर्स वाढीसह व्यवहार करताना दिसत आहेत आणि फक्त 3 शेअर्स व्यवहार करताना घसरणीसह दिसत आहे. यामध्ये एशियन पेंट्सचा शेअर केवळ 0.35 टक्क्यांनी घसरला आहे.

निफ्टीच्या शेअर्सची स्थिती

निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 47 शेअर्सनी वाढ नोंदवली आहे आणि 3 शेअर्स आज घसरणीसह व्यवहार करत आहेत. यामध्ये एशियन पेंट्स, आयटीसी आणि एचयूएलच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे.

मेहता इक्विटीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत तपासे म्हणाले, शेअर बाजारात अल्पकालीन रिकव्हरीची आशा नाही कारण जागतिक आर्थिक वातावरण नकारात्मक आहे, तर इस्राइल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरू आहे.

शुक्रवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, अदानी एंटरप्रायझेस, हिंदाल्को, कोल इंडिया आणि टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर डॉ रेड्डीज आणि एचयूएलच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली. शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात, गौतम अदानी समूहाच्या सर्व नऊ सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

27 ऑक्टोबर रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती सुझुकी, एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी, बजाज फिनसर्व्ह, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, सिप्ला, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन हॉटेल्स, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स, एम अँड एम फायनान्शियल सर्व्हिसेस, महिंद्रा लाईफस्पेस, ओबेरॉय रियल्टी, SBI कार्ड आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी त्यांचे निकाल जाहीर करणार आहेत.

28 ऑक्टोबर रोजी NTPC, IDFC फर्स्ट बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स, ग्रीनलॅम इंडस्ट्रीज, JBM ऑटो आणि मॅक्रोटेक डेव्हलपर्स 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी त्यांचे निकाल जाहीर करणार आहेत. त्यामुळे या निकालांचा परिणाम शेअर बाजारावर दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT