Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today Tata Motors rises 3 November 2023  Sakal
Share Market

Share Market Opening: सेन्सेक्समध्ये 350 अंकांची वाढ, आज सलग दुसऱ्या दिवशी बाजारात खरेदी; कोणते शेअर्स घसरले?

Share Market Opening: शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात खरेदीची नोंद झाली.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 3 November 2023:

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात खरेदीची नोंद झाली. चांगल्या जागतिक संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक तेजीसह व्यवहार करत आहेत. BSE सेन्सेक्स 350 अंकांनी वाढून 64,450 च्या पातळीवर पोहोचला आहे.

निफ्टीही 110 अंकांच्या तेजीसह 19,250 वर पोहोचला आहे. बाजारातील चौफेर खरेदीत आयटी, ऑटो आणि मेटल क्षेत्रात सर्वाधिक तेजी आहे.

सेन्सेक्सच्या शेअर्सची स्थिती

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 23 शेअर्स वाढीसह आणि 7 शेअर्स घसरणीसह व्यवहार करताना दिसत आहेत. टाटा मोटर्समध्ये सर्वाधिक 1.88 टक्के वाढ दिसून आली आणि टेक महिंद्रामध्ये 1.77 टक्के तेजी कायम आहे. आयसीआयसीआय बँक 1.41 टक्के आणि टायटन 1.33 टक्क्यांनी वर आहे. सन फार्मामध्ये 1.02 टक्के आणि इन्फोसिसमध्ये 0.99 टक्के वाढ दिसून आली आहे.

निफ्टीची स्थिती काय आहे?

50 निफ्टी शेअर्सपैकी 44 शेअर्स तेजीसह व्यवहार करताना दिसत आहेत आणि 6 शेअर्स घसरणीसह व्यवहार करताना दिसत आहेत. अपोलो हॉस्पिटल्स 4.52 टक्के आणि टाटा मोटर्स 2.24 टक्क्यांनी वधारले आहेत. अदानी पोर्ट्सने 2.08 टक्के, अदानी एंटरप्रायझेस 2 टक्के आणि यूपीएल 1.88 टक्क्यांनी वाढले.

निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील सर्व क्षेत्रात तेजीसह व्यवहार होत आहेत. आरोग्यसेवा निर्देशांकात सर्वाधिक 0.92 टक्के वाढ झाली आहे. मीडिया शेअर्स 0.82 टक्क्यांनी, मेटल शेअर्स 0.79 टक्क्यांनी आणि खासगी बँका 0.75 टक्क्यांनी वर आहेत.

जागतिक शेअर बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारातही सकारात्मक व्यवसाय सुरू झाल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शुक्रवारी सकाळच्या व्यवहारात सर्व आशियाई शेअर बाजारात वाढ नोंदवण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT