Share Market Opening 30 June 2023: चांगल्या जागतिक संकेतांमुळे शुक्रवारी बाजार तेजीसह उघडला. BSE सेन्सेक्स 380 अंकांनी वर चढल्यानंतर 64,295 वर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे निफ्टी100 अंकांच्या तेजीसह 19,073 वर व्यवहार करत आहे.
बाजारातील चौफेर खरेदीत आयटी आणि सरकारी बँकिंग शेअर्सचा समावेश आहे. पॉवर ग्रिड आणि एशियन पेंट्सचे शेअर्स निफ्टीमध्ये 2-2 टक्क्यांनी वधारत आहेत. बकरी ईदमुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजार बंद राहिला. बुधवारी बीएसई सेन्सेक्स 500 अंकांच्या वाढीसह 63,915 वर बंद झाला.
आजच्या व्यवहारात बँकिंग, आयटी, ऑटो, एफएफएमसीजी, एनर्जी, फार्मा हेल्थकेअर, कंझ्युमर ड्युरेबल्स यांसारख्या क्षेत्रातील शेअर्स तेजीत आहेत. स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्येही तेजी आहे.
निफ्टी आयटी 1.08 टक्क्यांच्या वेगाने व्यवहार करत आहे. सेबीने म्युच्युअल फंडांमध्ये शुल्क निश्चित न केल्यामुळे, एएमसी शेअर्समध्ये बाजारात तेजी दिसून येत आहे.
सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:
सेन्सेक्सच्या सुरुवातीच्या ट्रेडमध्ये पॉवरग्रिडच्या शेअरने 3.82 टक्क्यांच्या वाढीसह सर्वाधिक तेजीसह व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे एशियन पेंट्स, इन्फोसिस, टाटा मोटर्स, टायटन, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, विप्रो, लार्सन अँड टुब्रो, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, आयटीसी, एचडीएफसी, TCS आणि Bajaj Finserv किंवा इतर कंपन्यांचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत.
सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:
सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये, नेस्ले इंडिया, टाटा स्टील आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.
सिंगापूर एक्सचेंज निफ्टी फ्युचर्स 99 अंकांनी किंवा 0.52 टक्क्यांनी वाढून 19,185 अंकांवर व्यवहार केला. यावरुन दलाल स्ट्रीट सकारात्मकतेने सुरू होण्याची चिन्हे होती. प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्सने 140 चा टप्पा ओलांडला आणि निफ्टीने 19,050 चा टप्पा ओलांडला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.