Share Market Sakal
Share Market

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात, 'या' शेअर्समध्ये जोरदार खरेदी

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 21 August 2023:

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली आहे. बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह व्यवहार करत आहेत. BSE सेन्सेक्स 65,000 च्या महत्त्वाच्या पातळीच्या वर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे निफ्टीनेही 19,350 चा स्तर गाठला आहे.

या क्षेत्रांमध्ये खरेदी

बाजाराच्या तेजीमध्ये आयटी, मेटल, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात सर्वाधिक खरेदी होत आहे. अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्रायझेस हे निफ्टीमध्ये सर्वाधिक नफा मिळवणारे आहेत, तर M&M सर्वाधिक तोट्यात आहेत.

S&P BSE SENSEX

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

पॉवरग्रीड, एनटीपीसी, टाटा स्टील, टायटन, जेएसडब्ल्यू स्टील, इन्फोसिस, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, विप्रो, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक, एसबीआय आणि आयसीआयसीआय बँक आज बीएसई सेन्सेक्सवर वाढीसह व्यवहार करत होते.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती, एशियन पेंट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, नेस्ले इंडिया आणि बजाज फायनान्स सेन्सेक्सवर घसरणीसह व्यवहार करत होते.

NSE IX वर, GIFT निफ्टी पाच अंकांनी किंवा 0.03 टक्क्यांनी घसरून 19,324.50 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. यावरून दलाल स्ट्रीटची सुरुवात सपाट होऊ शकते असे संकेत मिळाले.

आशियाई शेअर बाजारात नरमाई

आज आशियाई शेअर बाजारांमध्ये नरमाई दिसून आली. याचे कारण चीनने बाजाराच्या अंदाजापेक्षा व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे जपान आणि इतर आशियाई शेअर बाजारांमध्ये नरमाईचा कल दिसून आला.

मेहता इक्विटीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) प्रशांत तपासे यांनी सांगितले की, इतर आशियाई बाजारातील कमजोरीमुळे बाजार कमकुवत उघडू शकतात कारण गुंतवणूकदारांना यूएस फेड रिझर्व्ह आणि इतर मध्यवर्ती बँकांद्वारे व्याजदरात आणखी वाढ होण्याची भीती वाटत आहे. जर असे झाले तर त्याचा परिणाम कर्जावर होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT