Share Market Opening Latest Updates Today 10 August 2023: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणापूर्वी आज शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. या बातम्यांचा परिणाम बाजारावर दिसत असून सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह व्यवहार करत आहेत.
आज शेअर बाजार उघडताना बीएसई सेन्सेक्स 50.42 अंकांच्या घसरणीसह 65,945 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. याशिवाय NSE चा निफ्टी 27 अंकांच्या घसरणीनंतर 19605 च्या पातळीवर उघडला.
सेन्सेक्स आणि निफ्टी शेअर्सची स्थिती
सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ 5 शेअर्स तेजीत आहेत आणि 25 शेअर्समध्ये घसरण होत आहे. याशिवाय निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 16 शेअर्समध्ये मजबूती दिसत असून 34 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.
सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी
अल्ट्राटेक सिमेंटचा शेअर बीएसई सेन्सेक्सवर सर्वाधिक वाढीसह व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे एनटीपीसी, मारुती, जेएसडब्ल्यू स्टील, पॉवरग्रीड, लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांचे शेअर्स सेन्सेक्सवर वाढीसह व्यवहार करत होते.
सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण
एचसीएल टेकचा शेअर आज सर्वात मोठ्या घसरणीसह व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे टेक महिंद्रा, एशियन पेंट्स, टीसीएस, नेस्ले इंडिया, आयटीसी, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, टाटा स्टील, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय, सन फार्मा आणि कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स सेन्सेक्सवर घसरणीसह व्यवहार करत होते.
आज 'या' कंपन्या तिमाही निकाल जाहीर करतील
Pidilite, LIC, Grasim, Hero Motocorp आणि SAIL सह इतर कंपन्या त्यांचे एप्रिल-जून तिमाहीचे आर्थिक निकाल आज जाहीर करतील.
शक्तिकांता दास थोड्या वेळात धोरणात्मक निवेदन देतील
दलाल स्ट्रीटच्या नजरा आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या धोरणात्मक निर्णयावर आहेत. काही वेळानंतर शक्तीकांत दास एमपीसीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देतील. रिझव्र्ह बँकेकडून पॉलिसी दर अपरिवर्तित ठेवणे अपेक्षित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.