Share Market latest updates today  Sakal
Share Market

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार तेजीत, सेन्सेक्स 62,659 वर, आयटी शेअर्समध्ये खरेदी

आशियाई बाजारांच्या चांगल्या सुरुवातीमुळे आज शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह व्यवहार करत आहेत.

राहुल शेळके

Share Market Opening 12 June 2023: आशियाई बाजारांच्या चांगल्या सुरुवातीमुळे आज शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह व्यवहार करत आहेत. बीएसईचा सेन्सेक्स 34.35 अंकांच्या वाढीसह 62,659 वर उघडण्यात यशस्वी झाला आहे, बाजारासाठी हे चांगले संकेत आहेत. याशिवाय NSE चा निफ्टी 18,595.05 वर 31.65 अंकांनी उघडला.

आज सेन्सेक्समधील 30 पैकी 18 शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत आणि 12 शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे.

सर्वाधिक तेजीमध्ये, इन्फोसिस 1.27 टक्क्यांनी आणि M&M 0.93 टक्क्यांनी वर होते. एचसीएल टेकमध्ये 0.87 टक्के, टाटा स्टीलमध्ये 0.60 टक्के आणि बजाज फायनान्समध्ये 0.56 टक्के वाढीसह व्यवसाय सुरू आहे.

निफ्टी शेअर्सची स्थिती?

निफ्टी शेअर्सचे 50 पैकी 26 शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत. 24 शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. बीपीसीएल, इन्फोसिस, एमअँडएम, एचसीएल टेक आणि एसबीआय लाईफ हे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक तेजीत आहेत.

याशिवाय अपोलो हॉस्पिटल्स, एचडीएफसी लाईफ, टेक महिंद्रा, नेस्ले, टीसीएस, बजाज फायनान्स आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज यांचे शेअर्सही वाढीसह व्यवहार करत आहेत.

आज बाजारातील क्षेत्रीय निर्देशांकावर नजर टाकली तर, फार्मा, खाजगी बँक आणि कंझ्युमर ड्युरेबल्स वगळता इतर सर्व क्षेत्रे निफ्टीमध्ये तेजीसह व्यवहार करत आहेत.

रियल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक 1.09 टक्क्यांची वाढ पाहायला मिळत आहे. आज आयटी शेअर्समध्ये 0.87 टक्क्यांच्या तेजीसह व्यवसाय होताना दिसत आहे आणि मेटल शेअर्समध्ये 0.37 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.

सिंगापूर एक्सचेंजवर निफ्टी फ्युचर्स 76 अंकांच्या म्हणजेच 0.41 टक्क्यांच्या वाढीसह 18,686 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. यावरून सोमवारी दलाल स्ट्रीटची सुरुवात सकारात्मक होऊ शकते, असे संकेत मिळाले.

आशियाई बाजारात तेजी:

या आठवड्यात युरोप, जपान आणि अमेरिकेच्या सेंट्रल बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेत महागाई दराचे आकडेही जाहीर होणार आहेत.

याचा परिणाम फेड रिझर्व्हच्या आगामी निर्णयांवर होऊ शकतो. दरम्यान, आशियाई शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Amit Shah : सोरेन सरकारची उलटगणती सुरू...अमित शहा : सोरेन सरकारने केंद्राचा निधी हडप केला

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Thane: पहिल्या मजल्यावरील घरात अचानक लागली आग अन्... वाचा पुढे काय झालं

Healthy Morning Tips: सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी करा 'या' पानाचे सेवन, दिवसभर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील

SCROLL FOR NEXT