Share Market latest updates today  Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 63100 वर, बँकिंग आणि आयटी शेअर्सची काय आहे स्थिती?

राहुल शेळके

Share Market Opening 15 June 2023: शेअर बाजार गुरुवारी घसरणीसह उघडला. बाजारातील प्रमुख निर्देशांक लाल चिन्हात व्यवहार करत आहेत. BSE सेन्सेक्स 63,100 वर आणि निफ्टी 18,700 च्या पातळीवर घसरला आहे. आयटी आणि बँकिंगच्या शेअर्सचा बाजारावर दबाव आहे.

इंडसइंड बँक, इन्फोसिस आणि ओएनजीसीचे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरले आहेत. तर डिव्हिस लॅबचा शेअर1.25 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. याआधी बुधवारी बीएसई सेन्सेक्स 85 अंकांनी वाढून 63,228 वर बंद झाला.

Share Market Opening 15 June 2023

जागतिक बाजारात घसरण

आज जागतिक बाजारातील घसरणीमुळे देशांतर्गत शेअर बाजारावर दबाव आहे. अमेरिकेतील सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदर स्थिर ठेवल्यानंतर जागतिक बाजारात घसरणीचे वातावरण आहे.

बुधवारी वॉल स्ट्रीटमध्ये घसरण झाली. बुधवारी डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज 0.68 टक्क्यांनी घसरून बंद झाला. तसेच Nasdaq मध्ये 0.39 टक्के आणि S&P 500 मध्ये 0.08 टक्के वाढ झाली. त्यानंतर आजच्या व्यवहारात आशियाई बाजारातही तोट्यात घसरण झाली आहे.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

बाजाराच्या सुरुवातीला बहुतांश मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी फक्त 12 शेअर्स कंपन्या नफ्यात होत्या. 18 कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

इंडसइंड बँक आणि इन्फोसिसचे शेअर्स 1-1 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. एनटीपीसी, टीसीएस, टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह सारखे शेअर्सही घसरणीसह व्यवहार करत आहेत. दुसरीकडे नेस्ले, सन फार्मा आणि हिंदुस्थान युनिलिव्हर या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

सेन्सेक्सवर, इंडसइंड बँकेचा शेअर सर्वाधिक 1.23 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे इन्फोसिस, टीसीएस, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा, विप्रो, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, लार्सन अँड टुब्रो, टाटा मोटर्स आणि एचडीएफसी सरणीसह व्यवहार करत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

IND vs BAN 1st Test : Virat Kohli वर रोहित वैतागला; 'तो' एक निर्णय ज्याने अम्पायरही चकित झाले

Latest Marathi News Live Updates: नानासाहेब परुळेकरांच्या जयंतीनिमित्त नितीन गडकरींचं भाषण

IND vs BAN Test, 2nd Day: गोलंदाजांमुळे पहिल्या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले, पण Rohit - Virat च्या अपयशाने टेंशन वाढवले

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

SCROLL FOR NEXT