Share Market Sakal
Share Market

Share Market Opening: सेन्सेक्स आणि निफ्टीने केला नवा विक्रम, कोणत्या शेअर्समध्ये आहे तुफान तेजी?

राहुल शेळके

Share Market Opening 19 July 2023: शेअर बाजारात तेजी आजही कायम आहे आणि त्याच्या जोरावर निफ्टी आणि सेन्सेक्सने त्यात नवा विक्रम निर्माण केला आहे. सेन्सेक्सने 67,083.42 या नवीन विक्रमी पातळीला स्पर्श केला आहे. सेन्सेक्ससोबतच निफ्टीनेही नवीन ऐतिहासिक पातळी गाठली आहे.

निफ्टीने नवीन विक्रमी उच्चांक गाठणे सुरूच ठेवले असून आज बाजार उघडताच निफ्टीने 19,828.90 चा उच्चांक गाठला आहे. निफ्टीने प्रथम विक्रमी उच्चांक गाठला आणि त्यानंतर लगेचच सेन्सेक्सनेही नवीन उच्चांक गाठला.

Share Market Opening 19 July 2023

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

बीएसई सेन्सेक्समध्ये आज इंडसइंड बँक, एनटीपीसी, इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, टाटा मोटर्स, सन फार्मा, कोटक महिंद्रा बँक, टायटन, टीसीएस, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या शेअर्समध्ये तेजी आहे.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण

आज महिंद्रा अँड महिंद्रा, नेस्ले इंडिया, भारती एअरटेल आणि मारुतीचे शेअर्स सेन्सेक्सवर घसरणीसह व्यवहाकर करत आहेत.

'या' कंपन्यांचे तिमाही निकाल आज येणार

टाटा कम्युनिकेशन्स, लार्सन अँड टुब्रो फायनान्स आणि बँक ऑफ महाराष्ट्रसह अनेक कंपन्या त्यांचे जून तिमाहीचे निकाल आज जाहीर करतील. कंपन्यांच्या तिमाही निकालांवर सर्वांच्या नजरा आहेत.

मेहता इक्विटीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) प्रशांत तपासे यांनी सांगितले की, GIFT निफ्टी निर्देशांकातील मंदीमुळे बाजार सपाट सुरू होऊ शकतो, परंतु अमेरिकन बाजारातील रात्रीच्या सत्रातील वाढ आणि संमिश्र वातावरणामुळे आशियाई बाजारातील व्यापारात तेजी दिसून आली.

सेन्सेक्स आणि निफ्टीच्या शेअर्सची स्थिती

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 21 शेअर्समध्ये तेजीसह व्यवहार करत आहेत आणि केवळ 9 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. दुसरीकडे, निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 35 शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे आणि 15 शेअर्समध्ये घसरण नोंदवली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi Wardha: मराठीतून भाषणाला सुरुवात...काँग्रेसने SC,ST,OBC यांना पुढं जाऊ दिलं नाही, PM मोदी वर्ध्यात काय म्हणाले?

IND vs BAN, 1st test: भारताला धक्का! मोहम्मद सिराजला सामना सुरू असतानाच सोडावं लागलं मैदान, जाणून काय झालं

इचलकरंजीत 'जर्मनी गँग'ची दहशत; नादाला लागाल तर जिवंत न सोडण्याची नागरिकांना धमकी, वाहनांची तोडफोड

आग अन् किटाळ! भारतीय गोलंदाजाच्या वेगवान माऱ्याने स्टम्प्स उखडून फेकले; फलंदाज सैरभैर झाले, Video

Latest Marathi News Updates : अमेरिकेत फेलोशिपसाठी आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची नियुक्ती; भारतातून निवड झालेल्या ठरल्या एकमेव अधिकारी

SCROLL FOR NEXT