Share Market update Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजार विक्रमी उच्चांकाजवळ, सेन्सेक्स 63,474 वर, 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ

सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली आहे.

राहुल शेळके

Share Market Opening 19 June 2023: सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 इंडेक्समध्ये तेजी दिसत आहे आणि दोन्ही निर्देशांक तेजीसह व्यवहार करत आहेत.

सेन्सेक्स 138.07 अंकांनी किंवा 0.22 टक्क्यांनी वाढला आणि हा निर्देशांक 63,522.65 च्या पातळीवर उघडला. याशिवाय निफ्टी 50 मध्ये 43.20 अंकांची किंवा 0.23 टक्क्यांची वाढ झाली आणि हा निर्देशांक 18,869.20 च्या पातळीवर उघडला.

आजच्या ट्रेडिंग सत्रात 1,771 शेअर्समध्ये खरेदी आणि 588 शेअर्समध्ये विक्री होत आहे. याशिवाय 173 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. कमकुवत जागतिक संकेतांदरम्यान, भारतीय शेअर बाजार तेजीसह उघडले.

आज शेअर बाजार आपल्या विक्रमी उच्च पातळीच्या अगदी जवळ आला आहे आणि लवकरच तो सर्वकालीन उच्च पातळी ओलांडून नवीन विक्रमी उच्चांक करेल असा अंदाज आहे.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

बजाज फिनसर्व्हचा शेअर सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 0.89 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे अल्ट्राटेक सिमेंटमध्ये 0.75 टक्के, सन फार्मामध्ये 0.72 टक्के, लार्सन अँड टुब्रोमध्ये 0.70 टक्के, टायटनमध्ये 0.67 टक्के, टाटा स्टीलमध्ये 0.61 टक्के, एशियन पेंट्समध्ये 0.61 टक्के, नेस्ले इंडियामध्ये 0.59 टक्के. पॉवरग्रीड 0.49 टक्के, एचडीएफसी 0.49 टक्क्यांनी आणि एचडीएफसी 0.46 टक्क्यांनी वाढले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

एनटीपीसी, इंडसइंड बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, विप्रो, आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेल हे शेअर्स सेन्सेक्सवर घसरणीसह व्यवहार करत आहेत.

Share Market Opening 19 June 2023

सिंगापूर एक्सचेंजवर निफ्टी फ्युचर्स सात अंकांनी म्हणजेच 0.04 टक्क्यांनी घसरून 18,891 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. यावरून सोमवारी दलाल स्ट्रीटची सुरुवात सपाट होऊ शकते, असे संकेत मिळाले होते.

सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 80 अंकांची वाढ पाहायला मिळाली. त्याच वेळी निफ्टी 18,865 अंकांच्या वर व्यवहार करत होता.

आशियाई शेअर बाजारांची सावध सुरुवात

गेल्या आठवड्यात आशियाई शेअर बाजाराने गेल्या पाच महिन्यांतील सर्वात वेगवान वाढ पाहिली. मात्र, सोमवारी आशियाई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी सुरुवातीच्या व्यवहारात सावध पवित्रा घेतला.

याचे कारण गुंतवणूकदार व्याजदरांबाबत चीनच्या निर्णयाची आणि यूएस फेड रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांच्या पुढील निर्णयाची वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT