Share Market latest updates today  Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची चांगली सुरुवात, निफ्टी विक्रमी उच्चांकाजवळ, काय आहे सेन्सेक्सची स्थिती?

राहुल शेळके

Share Market Opening 21 June 2023: आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजार तेजीसह उघडला. जागतिक बाजारातून कमकुवत होण्याची चिन्हे असतानाही शेअर बाजारात खरेदी दिसून येत आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह व्यवहार करत आहेत आणि निफ्टी 50 निर्देशांक विक्रमी उच्चांकाच्या जवळ आहे. सेन्सेक्समध्ये सुमारे 100 अंकांची वाढ दिसून आली, तर निफ्टी 50 निर्देशांक 18850 च्या जवळ उघडला.

आजच्या ट्रेडिंग सत्रात 1,782 शेअर्समध्ये खरेदी दिसून आली आणि 656 शेअर्समध्ये विक्रीचे वातावरण आहे. याशिवाय 120 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.

निफ्टीमध्ये आज मेटल, फार्मा, हेल्थकेअर आणि तेल आणि वायू शेअर्स वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह व्यवहार करत आहेत.

तेजीच्या आघाडीवर मीडिया शेअर्स आहेत जे 2.11 टक्क्यांच्या तेजीसह व्यवहार करत आहेत. त्याच वेळी, वित्तीय सेवांमध्ये 1.23 टक्क्यांची वाढ पाहिली जात आहे आणि रिअॅल्टी शेअर्स 1.11 टक्क्यांनी वाढले आहेत.

Share Market Opening 21 June 2023

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

अल्ट्राटेक सिमेंट सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 0.76 टक्क्यांनी वाढ झाली. त्याचप्रमाणे पॉवरग्रिड, विप्रो, लार्सन अँड टुब्रो, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, टीसीएस, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, टेक महिंद्रा, टायटन, नेस्ले इंडिया, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

सन फार्मा, एनटीपीसी, अॅक्सिस बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील आणि आयटीसी सेन्सेक्समध्ये घसरणीसह व्यवहार करत होते.

सिंगापूर एक्सचेंजवर निफ्टी फ्युचर्स 10 अंकांनी किंवा 0.05 टक्क्यांनी घसरून 18,872 अंकांवर व्यवहार करत होता. यावरून दलाल स्ट्रीटची सुरुवात सपाट होऊ शकते असे संकेत मिळाले.

मेहता इक्विटीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) प्रशांत तपासे यांनी सांगितले की, बहुतांश आशियाई बाजार घसरणीसह व्यवहार करत आहेत, त्यामुळे बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारांची सुरुवातही कमजोर होण्याची अपेक्षा आहे.

चीन आणि इतर अर्थव्यवस्थांमधील कमकुवत मागणीमुळे, कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण यांसारख्या नकारात्मक बातम्यांमुळेही बाजार कमजोर राहू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: मुंबईहून पुण्याला आता दीड तासांत जाता येणार! गडकरींनी दिली नव्या हायवेची माहिती

Tirupati Laddu: तिरुपती प्रसाद प्रकरणावरून केंद्राने मागविले उत्तर; दोषींवर होणार कठोर कारवाई

प्रो कबड्डी सीझन २ विजेता U Mumba संघ ११ व्या हंगामासाठी सज्ज; प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

IND vs BAN: Virat Kohli ची विकेट वादग्रस्त ठरली, पण पठ्ठ्याने १७ धावा करूनही मोठा पराक्रम केला

Nitin Gadkari : सरकारने कंपन्या चालवल्यामुळे मुलभूत प्रश्नच सुटले नाहीत; पुण्यात नितीन गडकरींचं विधान

SCROLL FOR NEXT