Share Market Opening On 23rd February 2023 : बुधवारच्या जोरदार घसरणीनंतर, जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार गुरुवारी किंचित वाढीसह उघडला.
BSE सेन्सेक्स 33 अंकांनी वधारला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 20 अंकांच्या वाढीसह 17,574 अंकांवर उघडला. पण काही काळातच बाजार घसरला.
आजच्या व्यवहारात बँकिंग सेक्टर, ऑटो, फार्मा, मीडिया, एनर्जी आणि कंझ्युमर ड्युरेबल्सच्या शेअर्समध्ये बाजार उघडताच घसरण होताना दिसत आहे, तर आयटी, मेटल, एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
स्मॉल कॅप निर्देशांक वर तर मिडकॅप निर्देशांक खाली आहे. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 12 समभाग तेजीसह व्यवहार करत आहेत तर 18 समभाग घसरत आहेत. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 21 समभाग वाढले आहेत तर 29 समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत.
आशियाई बाजारातील अनेक शेअर बाजार तेजीसह व्यवहार करत आहेत. हँगसेंग 0.75 टक्के, तैवान 1.37 टक्के, कोस्पी 1.12 टक्के, जकार्ता 0.17 टक्के वेगाने व्यवहार करत आहेत.
निक्केई 1.34 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे, तर स्ट्रेट टाइम्स 0.72 टक्क्यांनी घसरला आहे. याआधी बुधवारी डाऊ जोन्स 0.26 टक्क्यांनी, नॅस्डॅक 0.13 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.
बुधवारच्या घसरणीची मुख्य कारणे :
1. मंगळवारी यूएस मार्केटमध्ये वर्षातील सर्वात मोठी घसरण
2. रशिया-अमेरिका तणावात वाढ
3. फेड रेट वाढीच्या सिग्नलची वाट पाहणारे गुंतवणूकदार
4 . अदानी समूहाच्या शेअर्सची जोरदार विक्री
5 . विदेशी गुंतवणूकदारांकडून सतत विक्री
6. डॉलरमध्ये वाढ, आशियाई चलनांमध्ये कमजोरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.