Share Market Latest Updates Sakal
Share Market

Share Market Opening: घसरणीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला, 'या' शेअर्समध्ये वाढ

आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening 3 May 2023: आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच बुधवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. आजच्या व्यवहार सत्रादरम्यान, सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक घसरणीसह उघडले. सेन्सेक्समध्ये सुमारे 200 अंकांची घसरण आहे, तर निफ्टी निर्देशांक 18100 अंकांवर उघडला आहे.

BSE India

जगभरातील आर्थिक मंदीच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी देशांतर्गत शेअर बाजाराने घसरणीसह व्यवहार सुरू केला. बदललेल्या परिस्थितीत, घसरणीचा ट्रेंड जगभरातील बाजारपेठांवर वर्चस्व गाजवत आहे आणि देशांतर्गत बाजारही यापासून वाचलेले नाहीत.

हेच कारण आहे की आज बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या दोन्ही प्रमुख देशांतर्गत निर्देशांकांची सुरुवात घसरणीसह झाली आहे.

बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. सकाळी 09:20 वाजता सेन्सेक्समधील 30 पैकी 24 कंपन्यांचे शेअर्स घसरले होते. सुरुवातीच्या व्यवहारात केवळ 6 कंपन्यांचे शेअर्स किंचित वाढले होते.

आयटी शेअर्स आणि वित्तीय शेअर्समध्ये मोठी घसरण आहे. टेक महिंद्रा, इन्फोसिस, अॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे 1-1 टक्क्यांनी घसरले.

आजच्या ट्रेडिंग सत्रात 2,179 शेअर्समध्ये खरेदी झाली, तर 1314 शेअर्समध्ये विक्री झाली आणि 136 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.

सकाळच्या व्यवहारात, बीएसई सेन्सेक्समध्ये रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअर्सनी 5% ची वाढ नोंदवली. वोडाफोन आयडिया आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेचे शेअर्स बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात तेजीसह व्यवहार करत होते तर टाटा स्टील, इरकॉन इंटरनॅशनल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, यूको बँक आणि पीएनबीचे शेअर्समध्ये घसरण होती.

टायटन, अदानी विल्मार, एमआरएफ, हॅवेल्स आणि गोदरेज प्रॉपर्टीजचे निकाल बुधवारी येणार आहेत. बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात गौतम अदानी समूहाच्या सात कंपन्यांचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते, तर अदानी विल्मार, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी टोटल गॅस शेअर्समध्ये घसरण होती.

मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह बंद झाले. BSE सेन्सेक्स 242.27 अंकांनी किंवा 0.40 टक्क्यांनी वाढून 61,354.71 अंकांवर बंद झाला, तर NSE निफ्टी 82.65 अंकांनी किंवा 0.46 टक्क्यांनी वाढून 18,147.65 अंकांवर बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT