Share Market Latest Update Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात पुन्हा विक्रम, सेन्सेक्स-निफ्टी वाढीसह बंद; गुंतवणूकदार झाले मालामाल

Share Market Closing Today: आज बुधवारी (26 जून) देशांतर्गत शेअर बाजारात पुन्हा एकदा विक्रम झाला आहे. बाजाराने नवीन विक्रमी उच्चांक गाठला. बाजाराने सलग दुसऱ्या दिवशी नवा विक्रम नोंदवला. निफ्टीने 23842 आणि सेन्सेक्सने 78674 चा नवा विक्रम केला. निफ्टी बँकेने 52,988 चा नवा विक्रम केला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 26 June 2024: आज बुधवारी (26 जून) देशांतर्गत शेअर बाजारात पुन्हा एकदा विक्रम झाला आहे. बाजाराने नवीन विक्रमी उच्चांक गाठला. बाजाराने सलग दुसऱ्या दिवशी नवा विक्रम नोंदवला आहे. निफ्टीने 23842 आणि सेन्सेक्सने 78674 चा नवा विक्रम केला. निफ्टी बँकेने 52,988 चा नवा विक्रम केला.

निफ्टी 147 अंकांनी वाढून 23842 वर बंद झाला. सेन्सेक्स 620 अंकांनी वाढून 78674 वर आणि निफ्टी बँक 264 अंकांनी वाढून 52,870 वर बंद झाला. रिलायन्स, एअरटेल, अल्ट्राटेक सारख्या मोठ्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

फार्मा, मीडिया, इन्फ्रा, बँकिंग आणि तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले. तर आयटी, ऑटो, हेल्थकेअर, कंझ्युमर ड्युरेबल आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले. स्मॉल कॅप निर्देशांक वाढीसह बंद झाला तर मिड कॅप शेअर्सचा निर्देशांक घसरणीसह बंद झाला आहे.

Share Market Closing

बीएसईवर 4008 शेअर्सचे व्यवहार झाले ज्यामध्ये 1911 शेअर्स वाढीसह बंद झाले आणि 1971 शेअर्स घसरणीसह बंद झाले. 333 शेअर्स अपर सर्किटवर आणि 195 शेअर्स लोअर सर्किटवर बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 18 शेअर्स वाढीसह तर 12 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

BSE SENSEX

मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ

भारतीय शेअर बाजारातील विक्रमी वाढीमुळे मार्केट कॅपमध्येही जोरदार वाढ दिसून आली आहे. बीएसईवर कंपन्यांचे मार्केट कॅप 436.97 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 435.75 लाख कोटी रुपये होते. आजच्या सत्रात मार्केट कॅपमध्ये 1.22 लाख कोटी रुपयांची वाढ पाहायला मिळाली.

Share Market Closing

सेन्सेक्सचे कोणते शेअर्स तेजीत?

बीएसई सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 18 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (आरआयएल) शेअर्समध्ये सर्वाधिक 3.87 टक्के वाढ झाली आहे. यानंतर, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स सर्वाधिक वाढले.

तर उर्वरित 12 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्येही महिंद्रा अँड महिंद्रा (एम अँड एम) चे शेअर्स 1.89 टक्क्यांनी घसरले. याशिवाय टाटा स्टील, टेक महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील आणि टायटन यांचे शेअर्स लाल रंगात बंद झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT