Share Market Latest Update Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजारात भूकंप! सेन्सेक्स 1200 अंकांनी खाली; गुंतवणूकदारांचे 10.24 लाख कोटींचे नुकसान

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 5 August 2024: भारतीय शेअर बाजार सोमवारी (5 ऑगस्ट) घसरणीसह उघडले. जागतिक बाजारात जोरदार विक्री दिसून येत आहे. गिफ्ट निफ्टी आणि अमेरिकन फ्युचर्स मार्केटसह आशियाई बाजारांमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. गिफ्ट निफ्टी 350 हून अधिक अंकांची मोठी घसरण झाली.

अमेरिकन फ्युचर्स मार्केट देखील लाल रंगात होते. Dow 230 399 अंकांनी तर Nasdaq फ्युचर्स 399 अंकांनी खाली आला. शुक्रवारी देशांतर्गत बाजारात FII द्वारे 13,000 कोटी रुपयांची विक्री झाली.

गुंतवणूकदारांचे 10.24 लाख कोटी रुपये पाण्यात

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील मंदीच्या भीतीने जागतिक बाजार कोसळला. सेन्सेक्स आणि निफ्टी आज सलग दुसऱ्या सत्रात घसरले. गुंतवणूकदारांची संपत्ती 10.24 लाख कोटी रुपयांनी घसरली.

शेअर बाजाराचे मार्केट कॅप 446.92 लाख कोटी रुपयांवर आले आहे. मागील सत्रात मार्केट कॅप 457.16 लाख कोटी रुपये होते. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी 24,238 वर आणि सेन्सेक्स 1563 अंकांनी घसरून 79,419 वर आला.

सुरुवातीच्या व्यवसायात वाहन क्षेत्रावर खूप दबाव आहे. मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्समध्ये प्रत्येकी चार टक्क्यांनी घसरण होत आहे. हिंदाल्को, टाटा स्टील, टायटन कंपनी हे निफ्टी 50 च्या टॉप लूजर्समध्ये आहेत. बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे की या आठवड्यात जागतिक बाजारांवर लक्ष केंद्रित केले जाईल कारण दीर्घ कालावधीनंतर जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे.

सेन्सेक्सचे सर्व शेअर्स लाल

सेन्सेक्सवर 30 शेअर्स लिस्ट आहेत, त्यापैकी एकही ग्रीन झोनमध्ये नाही. सर्वात मोठी घसरण मारुती, टाटा मोटर्स आणि टायटनमध्ये झाली आहे. आज BSE वर 3065 शेअर्सचे व्यवहार होत आहेत. यामध्ये 465 शेअर्स तेजीत दिसत आहेत, 2435 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे आणि 165 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून येत नाही.

याशिवाय 65 शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर तर 25 शेअर्स एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले. 77 शेअर्स अप्पर सर्किटवर पोहोचले, तर 116 शेअर्स लोअर सर्किटवर पोहोचले.

इराण आणि इस्रायलमधील तणावाने जगभरातील बाजारपेठा हादरल्या

इराण आणि इस्रायलमधील तणावाने जगभरातील बाजारपेठा हादरल्या. देशांतर्गत शेअर बाजाराची स्थितीही चांगली नाही आणि इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी झपाट्याने घसरले. निफ्टीच्या सर्व क्षेत्रांचे निर्देशांक लाल आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही विक्रीचा दबाव आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२१ September in History: राज्यातील भाजप-सेना वाद २५ वर्षांपूर्वीही होताच! १९९९ मध्ये काय झालं होतं?

Latest Marathi News Updates : श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, सत्तापालटानंतर पहिल्यांदाच होत आहे मतदान

Eknath Shinde: ...विरोध काँग्रेसला भोवणार , तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्र विकसाच्या वाटेवर

भोस्ते घाटात पुरुषाचा सापळा, कवटी अन् झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी..; स्वप्नातल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ कायम

Badlapur School Crime : बदलापूर प्रकरणात आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली; धक्कादायक माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT