Share Market Opening Sakal
Share Market

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Sensex-Nifty Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी देशांतर्गत बाजारात जोरदार सुरुवात झाली आहे. बेंचमार्क निर्देशांक चांगल्या वाढीसह उघडले. सुमारे 400 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 75,000 च्या वर उघडला.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 3 May 2024 (Marathi News): आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी देशांतर्गत बाजारात जोरदार सुरुवात झाली आहे. बेंचमार्क निर्देशांक चांगल्या वाढीसह उघडले. सुमारे 400 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 75,000 च्या वर उघडला.

निफ्टी 22,700 च्या वर उघडला आणि नंतर 22,787 चा विक्रमी उच्चांक गाठला. निफ्टी बँक निर्देशांक 49,436 च्या आसपास उघडला. बजाज फायनान्स 7% पेक्षा जास्त वाढला. यासोबतच एनबीएफसीच्या शेअर्समध्येही वाढ झाली.

Sensex Today

कोणते शेअर्स तेजीत?

शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवसायात वाढ दर्शविणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये बजाज फायनान्स सात टक्क्यांनी तर बजाज फिनसर्व्ह, श्रीराम फायनान्स, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, इंडसइंड बँक यांचे शेअर्स वधारले.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात पॉवर ग्रिड, कोल इंडिया लिमिटेड, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स, लार्सन आणि एचडीएफसी लाईफ यांच्या शेअर्समध्ये घसरण होत होती.

Nifty Today

निफ्टीच्या शेअर्सची स्थिती

निफ्टीने नवीन विक्रमी उच्चांक गाठला असून त्याच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ होत आहे. त्याच्या 50 शेअर्सपैकी 42 शेअर्स वाढीसह आणि फक्त 8 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. बजाज फायनान्सचे शेअर्स 6 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत आणि आरबीआयकडून कंपनीला दिलासा मिळाल्याच्या बातमीनंतर ही वाढ दिसून आली आहे.

S&P BSE SENSEX

शेअर उघडल्यापासून 410 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. बजाज फिनसर्व्ह देखील प्रचंड वाढीसह व्यवहार करत आहे आणि साडेचार टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे. उर्वरित शेअर्समध्ये ओएनजीसी, एनटीपीसी आणि श्रीराम फायनान्स वाढीसह व्यवहार करत आहेत.

बीएसईचे मार्केट कॅप 410 लाख कोटी रुपयांच्या पुढे

बीएसईचे मार्केट कॅप 410 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले असून ते 410.62 लाख कोटी रुपयांवर आले आहे. BSE वर 3020 शेअर्सचे व्यवहार होत आहेत, त्यापैकी 1991 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत. 897 शेअर्समध्ये घसरण दिसून आली तर 132 शेअर्समध्ये कोणताही बदल न होता व्यवहार होत आहेत.

50 शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर आहेत आणि 6 शेअर्स एक वर्षाच्या नीचांकी पातळीवर आहेत. 110 शेअर्सवर अप्पर सर्किट तर 36 शेअर्सवर लोअर सर्किट लागू करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरू नये म्हणून केंद्राचा निर्णय

Mahadev Jankar: “मुख्यमंत्र्यानी नाही, पण पंतप्रधान नक्की होणार”; जानकरांनी व्यक्त केला विश्वास

Patanjali Owner: ना बाबा रामदेव, ना आचार्य बाळकृष्ण... 67,535 कोटी रुपयांच्या पतंजलीचा खरा मालक कोण?

Chitra Wagh: लाडकी बहीण योजना कर्नाटकाच्या गृहलक्ष्मी योजनेपेक्षा सरस, चित्रा वाघ यांचं वक्तव्य

SCROLL FOR NEXT