Share Market Today Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात; निफ्टी आणि मिडकॅपने केला नवा उच्चांक, कोणते शेअर्स चमकले?

Share Market Today: सोमवारी (15 जुलै) देशांतर्गत शेअर बाजारासाठी जागतिक बाजारातून चांगले संकेत मिळत आहेत. गिफ्ट निफ्टी 91 अंकांनी वाढून 24,614 च्या आसपास होता. अमेरिकन फ्युचर्स मार्केटमध्ये डाऊ-नॅस्डॅक फ्युचर्सही हिरव्या रंगात होते.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 15 July 2024: देशांतर्गत शेअर बाजारांनी सोमवारी (15 जुलै) जोरदार सुरुवात केली. बाजार मोठ्या उत्साहाने उघडला आहे. सेन्सेक्स 200 हून अधिक अंकांच्या वाढीसह उघडला तर निफ्टी आणि मिडकॅप निर्देशांक नवीन विक्रमी उच्चांकावर उघडले. आयटी शेअर्समध्ये आघाडी दिसून आली. एचसीएल टेकला सर्वाधिक फायदा झाला.

सकाळी जागतिक बाजारातून चांगले संकेत मिळाले. गिफ्ट निफ्टी 91 अंकांनी वाढून 24,614 च्या आसपास होता. अमेरिकन फ्युचर्स मार्केटमध्ये डाऊ-नॅस्डॅक फ्युचर्सही हिरव्या रंगात होते. शुक्रवारी अमेरिकन बाजारात पुन्हा उच्चांक झाला. मात्र, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नुकत्याच झालेल्या हल्ल्याचा बाजारावर काही परिणाम होतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Share Market Opening

गेल्या आठवड्यात बाजार वाढीसह बंद झाला आणि निफ्टी प्रथमच 24500 च्या वर बंद झाला. आयटी कंपन्यांच्या चांगल्या निकालामुळे देशांतर्गत बाजारात सलग सहाव्या आठवड्यात तेजी कायम राहिली.

या आठवड्यात मुख्य लक्ष इन्फोसिस, रिलायन्स, कोटक महिंद्रा बँकेसह अनेक मोठ्या कंपन्यांवर असणार आहे कारण त्यांचे निकाल जाहीर होणार आहेत. अर्थसंकल्पपूर्व बाजारात चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Share Market Opening

शेअर बाजार तज्ज्ञांचे मत काय?

असित सी मेहताचे हृषिकेश येडवे म्हणाले की, निफ्टीच्या महत्त्वाच्या पातळींवर नजर टाकली तर निफ्टीला  24,600-24,620 हा टप्पा ओलांडावा लागेल, जेणेकरून नवीन तेजीला प्रोत्साहन मिळू शकेल. तोपर्यंत गुंतवणूकदारांनी निफ्टीच्या घसरणीवर खरेदीचा विचार करावा. 24,170 च्या आसपास निफ्टीला महत्त्वाचा सपोर्ट आहे.

BSE SENSEX

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.94 लाख कोटींची वाढ

12 जुलै 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 4,52,38,553.68 कोटी रुपये होते. आज म्हणजेच 15 जुलै 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,54,33,393.76 कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 1,94,840.08 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सेन्सेक्सचे कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्सवर 30 शेअर्स लिस्ट आहेत, त्यापैकी 22 शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत. एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट आणि टेक महिंद्राचे शेअर्स सर्वात जास्त तेजीत आहेत. दुसरीकडे, एशियन पेंट्स, टाटा स्टील आणि भारती एअरटेलमध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.

आज BSE वर 2877 शेअर्सची खरेदी-विक्री होत आहे. यामध्ये 2073 शेअर्स तेजीत दिसत आहेत, 636 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे आणि 168 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून येत नाही. याशिवाय 138 शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर तर 19 शेअर्स एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले. 126 शेअर्स अप्पर सर्किटवर पोहोचले, तर 78 शेअर्स लोअर सर्किटवर पोहोचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

Sakal Podcast: मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार ते पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार

Baramati Assembly constituency 2024 : बारामतीच्या सांगता सभांकडे राज्याचे लक्ष..!

SCROLL FOR NEXT