Share Market Opening Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजारात पुन्हा एकदा नवीन विक्रम; निफ्टीने पार केला 22,600चा टप्पा, कोणते शेअर्स तेजीत?

Sensex-Nifty Today: आज शेअर बाजारात नवीन विक्रम झाला. बाजार उघडताच प्रमुख निर्देशांक नवीन सार्वकालिक उच्चांकावर व्यवहार करत होते. निफ्टी प्रथमच 22600 आणि मिडकॅप निर्देशांक 50000 च्या पुढे व्यवहार करत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 4 April 2024 (Marathi News):

आज शेअर बाजारात नवीन विक्रम झाला. बाजार उघडताच प्रमुख निर्देशांक नवीन सार्वकालिक उच्चांकावर व्यवहार करत होते. निफ्टी प्रथमच 22600 आणि मिडकॅप निर्देशांक 50000 च्या पुढे व्यवहार करत आहे. सेन्सेक्सनेही 500 अंकांची उसळी घेत 74,400 च्या जवळ पोहोचला आहे. मेटल आणि बँकिंग क्षेत्रात तेजी आहे. एचडीएफसी बँक निफ्टीमध्ये सर्वाधिक तेजीत आहे, तर इंडसइंड बँक सर्वाधिक घसरला आहे.

Share Market Opening

कोणते शेअर्स तेजीत?

आज शेअर बाजारात एनटीपीसी 1.28 टक्के आणि ॲक्सिस बँक 0.89 टक्क्यांनी वर आहे. पॉवरग्रीड 0.73 टक्के आणि कोटक महिंद्रा बँक 0.65 टक्क्यांनी वधारले आहे. या व्यतिरिक्त टाटा स्टील, टाटा मोटर्स, टायटन आणि टीसीएस सारखे टाटाचे अनेक शेअर्स वर आहेत.

याशिवाय अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील, नेस्ले, इन्फोसिस, एशियन पेंट्स, एम अँड एम, एचयूएल आणि एल अँड टी या कंपन्यांच्या शेअर्समध्येही बीएसईवर जोरदार वाढ होत आहे.

Share Market Opening

बँक आणि मेटल शेअर्स चमकले

बँकिंग आणि मेटल शेअर्स तेजीत आहेत. आज बाजाराला मोठ्या वाढीकडे नेण्यात सर्वात मोठा वाटा या शेअर्सचा आहे. बाजार उघडताच बँक निफ्टीने 48,254.65 चा उच्चांक गाठला आणि तो 48,636.45 च्या सर्वकालीन उच्चांकाच्या अगदी जवळ आला.

S&P BSE SENSEX

निफ्टीच्या सर्वाधिक तेजीत असणारे पाच शेअर्स बँकिंग क्षेत्रातील आहेत. यामध्ये एचडीएफसी बँक 2.84 टक्क्यांनी आणि एयू स्मॉल फायनान्स बँक 2.52 टक्क्यांनी वधारला आहे. या व्यतिरिक्त बंधन बँक, ॲक्सिस बँक आणि फेडरल बँक हे सर्वाधिक वाढणारे शेअर्स आहेत.

मार्केट कॅप 400 लाख कोटींच्या जवळ

बीएसईवरील मार्केट कॅप 399.99 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे आणि ते 400 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपच्या मार्गावर आहे. शेअर बाजारासाठी ही ऐतिहासिक कामगिरी असून भारतीय शेअर बाजार मोठ्या उंचीवर पोहोचला आहे.

शेअर बाजारात चढ-उताराचे संकेत

यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सांगितले की ते या वर्षाच्या उर्वरित महिन्यांत व्याजदर कपातीची शक्यता पाहत आहेत. शुक्रवारी रिझर्व्ह बँकेचे आर्थिक धोरण जाहीर होणार आहे, त्यामुळे गुरुवारी शेअर बाजारात सावध व्यवहार होऊ शकतात.

कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री यामुळेही शेअर बाजारात चढ-उतार होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT