Share Market Latest Update Sakal
Share Market

Share Market Opening: निफ्टीने आजही केला नवा विक्रम; सेन्सेक्स 100 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Today: मंगळवारी (16 जुलै) शेअर बाजार वाढीसह उघडले. निफ्टीने आजही नवा उच्चांक गाठला आहे. तो प्रथमच 24,650 च्या पुढे गेला आहे. उघडल्यानंतर सेन्सेक्सने जवळपास 100 अंकांची वाढ नोंदवली होती.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 16 July 2024: मंगळवारी (16 जुलै) शेअर बाजार वाढीसह उघडले. निफ्टीने आजही नवा उच्चांक गाठला आहे. तो प्रथमच 24,650 च्या पुढे गेला आहे. उघडल्यानंतर सेन्सेक्सने जवळपास 100 अंकांची वाढ नोंदवली होती. मिडकॅप निर्देशांकातही चांगली वाढ झाली.

भारती एअरटेल, कोल इंडिया, एम अँड एम, अदानी एंटरप्रायझेस हे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. सेन्सेक्स 67 अंकांनी वाढून 80,731 वर उघडला. निफ्टी 29 अंकांनी वाढून 24,615 वर तर बँक निफ्टी 11 अंकांनी वाढून 52,466 वर उघडला.

Share Market Opening

रेलिगेअर ब्रोकिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा म्हणाले की, आम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे आणि “घसरणीत खरेदी” धोरणाची शिफारस केली आहे. अनुकूल देशांतर्गत घटकांव्यतिरिक्त, सकारात्मक जागतिक संकेत देखील ट्रेंडला चालना देत आहेत. व्यापाऱ्यांनी स्टॉक निवड आणि ट्रेड मॅनेजमेंटवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

24600 ची पातळी निफ्टीसाठी खूप महत्त्वाची आहे. गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांपासून निफ्टी या पातळीच्या आसपास आहे आणि या काळात ओपन इंटरेस्ट डेटाचा चांगला जम बसला आहे. जोपर्यंत निफ्टी 24500 च्या वर राहील तोपर्यंत तो बाय ऑन डिप्स मोडमध्ये राहील असे तज्ञांचे मत आहे.

Share Market Opening

सेन्सेक्सचे कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 20 शेअर्समध्ये वाढ तर 10 शेअर्स घसरत आहेत. भारती एअरटेल टॉप गेनर आहे आणि तो 2 टक्क्यांनी वाढला आहे. कोल इंडिया 1.69 टक्के, बीपीसीएल 1.58 टक्के, इन्फोसिस 1.04 टक्के आणि एचयूएल 1.03 टक्के वाढले आहेत.

घसरलेल्या शेअर्समध्ये कोटक महिंद्रा बँक 0.98 टक्क्यांनी, एसबीआय लाइफ 0.87 टक्क्यांनी, एल अँड टी 0.78 टक्क्यांनी, एनटीपीसी 0.66 टक्क्यांनी, बजाज फायनान्स 0.65 टक्क्यांनी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज 0.63 टक्क्यांनी घसरत आहे.


BSE SENSEX

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.25 लाख कोटींची वाढ

15 जुलै 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 4,55,06,566.48 कोटी रुपये होते. आज म्हणजेच 16 जुलै 2024 रोजी बाजार उघडताच तो 4,56,31,840.63 कोटी रुपयांवर पोहोचला. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 1,25,274.15 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

बीएसईमध्ये 3186 शेअर्सवर ट्रेड होताना दिसत आहे, त्यापैकी 2167 शेअर्समध्ये वाढ होत आहे. 911 शेअर्स घसरत आहेत आणि 108 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 116 शेअर्सवर अप्पर सर्किट तर 67 शेअर्सवर लोअर सर्किट लावण्यात आले आहे. 146 शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: “रंगात धर्म अन् संविधानात रंग..! पेशव्यांना दिलेली शिकवण भाजपला देण्याची गरज”; काँग्रेसचा हल्लाबोल

Ram Mandir : अयोध्येमध्ये कामगारांचा तुटवडा; राम मंदिर पूर्ण होण्यास होतोय विलंब

Ok Sorry Thank You Book : ‘ओके... सॉरी... थॅँक यू’ ठरतेय लोकप्रिय

Rohit Sharma ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी पालकत्व रजा घ्यावी की नाही यावरून गावसकर-फिंचमध्ये मतभेद; रितिका म्हणतेय...

Raj Thackeray Pune Speech: सगळं जातीचं राजकारण शरद पवारांचे, कसबा-कोथरुडमध्ये राज ठाकरे कडाडले...

SCROLL FOR NEXT