Share Market Today Sensex ends 362 pts lower, Nifty sinks below 22,050 amid volatile trade  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजार आज घसरणीसह बंद; सेन्सेक्स 360 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Today: मंगळवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. कमकुवत जागतिक संकेत आणि एफआयआयने केलेली विक्री यामुळे बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स 361 अंकांनी घसरून 72,470 वर आला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 26 March 2024: मंगळवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. कमकुवत जागतिक संकेत आणि एफआयआयने केलेली विक्री यामुळे बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स 361 अंकांनी घसरून 72,470 वर आला.

निफ्टीही 92 अंकांनी घसरून 22,004 वर आला. बाजारात सर्वाधिक विक्री बँकिंग, विशेषत: खाजगी बँकिंग आणि आयटी क्षेत्रात झाली. तर मेटल आणि रियल्टी क्षेत्रात खरेदी झाली.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात मेटल, रिअल इस्टेट, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑइल अँड गॅस, हेल्थकेअर आणि ऑटो शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. तर बँकिंग, आयटी, मीडिया, एफएमसीजी, फार्मा शेअर्स घसरले.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठी खरेदी झाली आहे. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 10 शेअर्स वाढीसह आणि 20 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 20 शेअर्स वाढीसह आणि 30 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

कोणते शेअर्स वाढले?

आजच्या बाजारात हिंदाल्को (2.34 टक्के वाढ), बजाज फायनान्स (2.42 टक्के), अदानी पोर्ट (1.90 टक्के वाढ), ब्रिटानिया (1.70 टक्के) हे निफ्टी 50चे शेअर्स सर्वाधिक वाढले. आज सकाळच्या सत्रात एचडीएफसी लाइफ आणि अदानी पोर्टमध्ये चांगली वाढ झाली होती आणि ते तेजीसह बंद झाले.

आजच्या व्यवहारात लार्सन 1.38 टक्क्यांनी, एनटीपीसी 1.32 टक्क्यांनी, ॲक्सिस बँक 0.81 टक्क्यांनी, बजाज फिनसर्व्ह 0.66 टक्क्यांनी वाढला. पॉवर ग्रिड 2.07 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले, तर भारती एअरटेल 1.99 टक्क्यांनी घसरला, विप्रो 1.50 टक्क्यांनी घसरला.

गुंतवणूकदारांनी कमावले 39,000 कोटी

शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण झाली असली तरी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. बीएसईवर कंपन्यांचे बाजार मूल्य 382.52 लाख कोटी रुपये झाले आहे. जे गेल्या सत्रात 382.13 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात शेअर बाजाराच्या बाजार भांडवलात 39,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT