Share Market Latest Update Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजार सपाट बंद; मार्केट कॅप 447.43 लाख कोटी रुपयांवर, कोणते शेअर्स तेजीत?

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 4 July 2024: देशांतर्गत शेअर बाजार सपाट बंद झाला. उच्चांक गाठल्यानंतर बाजारात प्रॉफिट बुकींगचे वातावरण दिसून आले. निफ्टीने आज 24,401 ही विक्रमी पातळी गाठली. सेन्सेक्सनेही आज 80,392 चा विक्रमी स्तर गाठला.

निफ्टी बँकेनेही 53,357 च्या विक्रमी पातळीला स्पर्श केला. पण शेवटी निफ्टी 15 अंकांनी वाढून 24,302 वर बंद झाला. सेन्सेक्स 62 अंकांनी वाढून 80,049 वर आणि निफ्टी बँक 14 अंकांनी वाढून 53,103 वर बंद झाला.

Share Market Today

फार्मा आणि आयटी क्षेत्रात खरेदी

आजच्या बाजारात फार्मा क्षेत्रात मोठी खरेदी दिसून आली. यानंतर आयटी क्षेत्रात खरेदीदारांचा कल दिसून आला. आयसीआयसीआय बँकेसह कोटक महिंद्रा बँकेने बँकिंग क्षेत्रातील सुरुवातीच्या घसरणीची भरपाई केली. एचडीएफसी बँकेचा शेअर दोन टक्क्यांहून अधिक घसरला.

Share Market Today

कोणते शेअर्स तेजीत?

आजच्या बाजारातील निफ्टी 50 इंडेक्समध्ये एचसीएल टेक (2.87 टक्के), टाटा मोटर्स (2.70टक्के), आयसीआयसीआय बँक (2.65 टक्के), सन फार्मा (1.50 टक्के) आणि इन्फोसिस (1.48 टक्के) तेजीत होते. आजच्या बाजारात निफ्टी 24300 च्या वर राहिला कारण यात फार्मा आणि आयटीचा क्षेत्राचा मोठा वाटा होता.

BSE SENSEX

कोणते शेअर्स घसरले?

निफ्टी 50 इंडेक्समधील घसरलेल्या शेअर्समध्ये एचडीएफसी बँक (2.37 टक्के घसरण). याशिवाय बजाज फायनान्स (2 टक्के घसरण), अदानी एंटरप्रायझेस (1.50 टक्के घसरण) आणि विप्रो (1.48 टक्के घसरण) यांचा समावेश होता.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात ऑटो, आयटी, फार्मा, एनर्जी, हेल्थकेअर, ऑइल अँड गॅस आणि बँकिंग शेअर्स वाढीसह बंद झाले. तर एफएमसीजी, मेटल, रिअल इस्टेट आणि कंझ्युमर ड्युरेबल्स शेअर्समध्ये घसरण झाली आहे. आजच्या सत्रात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी झाली, त्यामुळे निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक वाढीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 13 शेअर्स वाढीसह आणि 17 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

मार्केट कॅप विक्रमी उच्चांकावर

भारतीय शेअर बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये आजही नेत्रदीपक वाढ झाली आहे. बीएसईवर शेअर्सचे मार्केट कॅप 447.43 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 445.43 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2 लाख कोटींची वाढ झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तुतारीची उमेदवारी मिळवण्यासाठी काय आहे पात्रता? शरद पवारांच्या जवळच्या नेत्यानं सांगितलं गणित

BSNL Sim Card Online : घरबसल्या 90 मिनिटांत मिळणार BSNL 4G आणि 5G सिमकार्ड; जाणून घ्या ऑनलाईन ऑर्डरची सोपी प्रक्रिया

मुंबईतील आगीत 7 जणांचा मृत्यू ते तुतारीची उमेदवारी मिळवण्यासाठी काय आहे निकष? सकाळी 9 पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

काय ते स्वित्झर्लंड अन् काय ती उधारी... CM शिंदेंच्या दौऱ्याची करोडोंची थकबाकी, कंपनीने पाठवली कायदेशीर नोटीस

Pune Accident: पीएमपीएमएलच्या बसचे ब्रेक अचानक झाले निकामी, त्यानंतर जे घडलं ते...video viral

SCROLL FOR NEXT