Share Market

Share Market Closing: निफ्टी विक्रमी उच्चांकावर बंद; सेन्सेक्स 285 अंकांनी वधारला, HDFC लाइफ, JSW स्टील तेजीत

Share Market Closing Today: आज निफ्टी विक्रमी तेजीसह बंद झाला आहे. सेन्सेक्स आणि बँक निफ्टीही चांगल्या वाढीसह बंद झाले. निफ्टी 93 अंकांनी वाढून 24,951 वर बंद झाला. सेन्सेक्स 285 अंकांनी वाढून 81,741 वर आणि निफ्टी बँक 54 अंकांनी वाढून 51,553 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 31 July 2024: आज निफ्टी विक्रमी तेजीसह बंद झाला आहे. सेन्सेक्स आणि बँक निफ्टीही चांगल्या वाढीसह बंद झाले. निफ्टी 93 अंकांनी वाढून 24,951 वर बंद झाला. सेन्सेक्स 285 अंकांनी वाढून 81,741 वर आणि निफ्टी बँक 54 अंकांनी वाढून 51,553 वर बंद झाला. एचडीएफसी लाइफ, जेएसडब्ल्यू स्टील, एशियन पेंट्स आणि भारती एअरटेलने निफ्टीवर सर्वाधिक वाढ झाली.

आज कोणते शेअर्स तेजीत होते?

आज, टोरेंट पॉवरचे शेअर्स 16.60% वाढीनंतर 1,866 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. याशिवाय नेटवर्क 10 मीडियाचे शेअर 7.95% तेजीसह बंद झाले. JSW स्टीलच्या शेअर्समध्ये 2.90 टक्के वाढ झाली. तर, एशियन पेंट्समध्ये 2.65%, NTPC मध्ये 2.23% आणि मारुती सुझुकीमध्ये 1.89% वाढ झाली.

Share Market Closing

घसरण झालेल्या शेअर्समध्ये RIL चे शेअर्स 0.52%, इन्फोसिस 0.48%, टाटा मोटर्स 0.45% च्या घसरणीसह बंद झाले. याशिवाय इंडिया मार्टचे शेअर्स 6.59% च्या लोअर सर्किटवर पोहोचले. एजिस लॉजिस्टिक्सचे शेअर्स 5.81% घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing

BSE चे मार्केट कॅपिटलायझेशन

BSE वर कंपन्यांच्या शेअर्सचे मार्केट कॅप 462.72 लाख कोटी रुपये झाले आहे, जे यूएस डॉलरमध्ये 5.52 ट्रिलियन डॉलर आहे. बंद होण्याच्या वेळी, BSE वर 2119 शेअर्समध्ये वाढ झाली. 1834 शेअर्समध्ये घसरण झाली आणि 83 शेअर्स कोणताही बदल न होता बंद झाले.

BSE SENSEX

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 20 शेअर्स वाढीसह आणि 10 शेअर्स घसरणीसह बंद झाले. JSW स्टील 3.64 टक्क्यांनी वाढून बंद झाला. यासह एशियन पेंट्स, मारुती, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स आणि भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 0.51 टक्क्यांनी घसरले. त्यामागे टाटा मोटर्सचे शेअर्सही 0.51 टक्क्यांनी घसरले. इन्फोसिस, M&M, बजाज फायनान्स आणि पॉवर ग्रिडचे शेअर्स सर्वात जास्त घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांनी 1.81 लाख कोटी कमावले

BSE वर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 31 जुलै रोजी वाढून 462.72 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे मंगळवार, 30 जुलै रोजी 460.91 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.81 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.81 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kangana Ranaut: महाराष्ट्राचा निकाल लागताच कंगनानं उद्धव ठाकरेंना दैत्य संबोधलं! म्हटलं...

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: पहिला दिवस संपला! स्टार खेळाडूंनी भाव खाल्ला; अनेक खेळाडू झाले मालामाल

Nilesh Rane : आमदार होताच निलेश राणेंची धमकी, म्हणाले, ...तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करु

IND vs AUS 1st Test: ४ बाद, १७ धावा! टीम इंडियाचा दरारा; ऑस्ट्रेलियात मोडला ११३ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम

Latest Maharashtra News Updates : हेमंत रासने यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

SCROLL FOR NEXT