Share Market Latest Update Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांनी वर, कोणते शेअर्स वाढले?

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 7 August 2024: बुधवारी (7 ऑगस्ट) भारतीय शेअर बाजाराची जोरदार सुरुवात झाली आहे. निफ्टी 300 अंकांनी वर होता, तर सेन्सेक्सही जवळपास 1,000 अंकांनी वधारत होता. निफ्टी बँकेत 500 हून अधिक अंकांची वाढ झाली. सुरुवातीला सेन्सेक्स 972 अंकांनी वाढून 79,565 वर पोहोचला.

निफ्टी 297 अंकांनी वाढून 24,289 वर तर बँक निफ्टी 538 अंकांनी वाढून 50,286 वर उघडला. आयटी निर्देशांक 2% वर होता. आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. याशिवाय एनबीएफसी आणि सरकारी शेअर्सही वाढीसह व्यवहार करत होते.

Share Market Opening

निफ्टीवर सर्व शेअर्स तेजीत

NSE च्या निफ्टीमध्ये सर्व शेअर्स तेजीत आहेत. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 48 शेअर्स वाढीच्या स्थितीत आहेत आणि फक्त 2 शेअर्स घसरत आहेत. वाढत्या शेअर्समध्ये, ओएनजीसी 4.62 टक्क्यांच्या वाढीसह अव्वल आहे आणि यानंतर कोल इंडिया, बीपीसीएल, एम अँड एम आणि हीरो मोटोकॉर्पच्या शेअर्समध्ये वाढ होत आहे.

Share Market Opening

बँक ऑफ जपानच्या आश्वासनाचा जगभरातील बाजारांवर परिणाम

बँक ऑफ जपानच्या आश्वासनाचा जगभरातील बाजारांवर सकारात्मक परिणाम होत आहे. देशांतर्गत बाजारातही खरेदीचा कल दिसून येत आहे आणि देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी प्रत्येकी 1 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.

बँक ऑफ जपानचे डेप्युटी गव्हर्नर म्हणाले की, बाजार स्थिर राहिल्यास बँक व्याजदरात वाढ करणार नाही. यामुळे, निफ्टीच्या सर्व क्षेत्रांचे निर्देशांक वाढले आहेत आणि रिअल्टीच्या निर्देशांकात 3 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदी होत आहे.

BSE SENSEX

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 5.41 लाख कोटींची वाढ

6 ऑगस्ट 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप रुपये 4,39,59,953.56 लाख कोटी होते. आज म्हणजेच 7 ऑगस्ट 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,45,01,708.75 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 5,41,755.19 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सेन्सेक्सचे कोणते शेअर्स वाढले?

सेन्सेक्सवर 30 शेअर्स लिस्ट आहेत. या सर्व शेअर्समध्ये वाढ झाली आहे. इन्फोसिस, एमअँडएम आणि मारुतीमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. आज BSE वर 2679 शेअर्सची खरेदी-विक्री होत आहे. यामध्ये 2223 शेअर्स वाढताना दिसत आहेत, 358 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

98 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून येत नाही. याशिवाय 74 शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर तर 9 शेअर्स एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले. 87 शेअर्स अप्पर सर्किटवर पोहोचले, तर 41 शेअर्स लोअर सर्किटवर पोहोचले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : सरकारने कंपन्या चालवल्यामुळे मुलभूत प्रश्नच सुटले नाहीत; पुण्यात नितीन गडकरींचं विधान

Phulambri Vidhansabha Constituency : मतदाराच्या पसंतीवरच ठरणार काँग्रेसचा उमेदवार..! सर्वेत ज्याचे नाव अगोदर, तोच ठरणार बाजीगर

Pune Accident Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

IND vs BAN 1st Test : Virat Kohli वर रोहित वैतागला; 'तो' एक निर्णय ज्याने अम्पायरही चकित झाले

Latest Marathi News Live Updates: नानासाहेब परुळेकरांच्या जयंतीनिमित्त नितीन गडकरींचं भाषण

SCROLL FOR NEXT