Share Market Closing Sakal
Share Market

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; मोठ्या कंपन्यांचे शेअर्स गडगडले, गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 21 June 2024: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (21 जून) देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार प्रॉफिट बुकिंग झाली. आठवडाभरात त्यांनी ज्या विक्रमी उच्चांकांना स्पर्श केला होता त्यापासून बाजार खाली आला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजी गमावली आणि प्रत्येक निर्देशांक अर्ध्या टक्क्यांनी घसरले.

निफ्टीने 23,667 चा नवा विक्रम केला होता. व्यवहार संपेपर्यंत निफ्टी 65 अंकांनी घसरून 23,501 वर बंद झाला होता. सेन्सेक्स 269 अंकांनी घसरला आणि 77,209 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी बँक 121 अंकांनी घसरून 51,661 वर बंद झाला.

Share Market Closing

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात, आयटी शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे निफ्टी आयटी निर्देशांक वाढीसह बंद झाला. याशिवाय मेटल आणि मीडिया शेअर्सचे नुकसान झाले आहे. कंझ्युमर ड्युरेबल शेअर्समध्येही वाढ दिसून आली. तर बँकिंग, ऑटो, फार्मा, हेल्थकेअर, ऊर्जा, तेल आणि गॅस आणि एफएमसीजी शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing

मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक वेगाने व्यवहार करत होते. परंतु दोन्ही निर्देशांक बाजारात विक्रीमुळे घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 11 शेअर्स वाढीसह आणि 19 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

BSE SENSEX

मार्केट कॅपमध्ये घसरण

शेअर बाजारातील विक्रीमुळे मार्केट कॅप घसरले आहे. बीएसईवर शेअर्सचे मार्केट कॅप घसरले आहे आणि ते 434.07 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे, जे मागील सत्रात 435.75 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. याचा अर्थ आजच्या सत्रात मार्केट कॅपमध्ये 1.68 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

कोणते शेअर्स तेजीत?

आजच्या व्यवहारात भारती एअरटेल 2.32 टक्के, इन्फोसिस 1.08 टक्के, टीसीएस 0.59 टक्के, जेएसडब्ल्यू स्टील 0.54 टक्के, एनटीपीसी 0.50 टक्के, कोटक महिंद्रा बँक 0.48 टक्के, पॉवर ग्रिड 325.80 टक्के, विप्रो 0.01 टक्के वाढीसह बंद झाले. अल्ट्राटेक सिमेंट 2.22 टक्के, एलअँडटी 1.78 टक्के, टाटा मोटर्स 1.74 टक्के, नेस्ले 1.71 टक्के, एचयूएल 1.63 टक्के, टाटा स्टील 1.37 टक्के घसरून बंद झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

Jammu Kashmir Exit Poll Result: हरियाणानंतर जम्मू-काश्मीरमध्येही भाजपला धक्का; काय सांगतो एक्झिट पोलचा अंदाज? वाचा सविस्तर...

IND vs BAN: टीम इंडियाचं ठरलं! अभिषेक शर्मा, संजू सॅमसन ओपनिंग करणार

मेट्रोच्या Aarey To BKC Aqua Line भुयारी सेवेला आजपासून सुरूवात, कसं असेल भाडं आणि वेळापत्रक, जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT