Share Market Closing Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजाराने घेतला सुटकेचा निश्वास; 5 दिवसांनंतर निफ्टी वाढीसह बंद, कोणते शेअर्स तेजीत?

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 10 May 2024: देशांतर्गत शेअर बाजारात सप्ताहाची सांगता वाढीसह झाली. सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजीसह व्यवहार बंद झाले. मात्र, बँक निफ्टी सलग नवव्या दिवशी घसरणीसह बंद झाला. दिवसभर बाजारात संमिश्र व्यवहार होत होता. निफ्टी 97 अंकांनी वाढून 22,055 वर बंद झाला आणि सेन्सेक्स 260 अंकांनी वाढून 72,664 वर बंद झाला. निफ्टी बँक 66 अंकांनी घसरून 47,421 वर बंद झाला.

Share Market Today

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात एफएमसीजी, एनर्जी ऑटो, फार्मा, मेटल, कंझ्युमर ड्युरेबल्स, तेल, गॅस आणि आरोग्य सेवा शेअर्समध्ये मजबूत वाढ दिसून आली. तर आयटी आणि बँकिंग शेअर्स घसरणीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही चमक दिसून आली.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 21 शेअर्स वाढीसह आणि 9 शेअर्स घसरणीसह बंद झाले. मात्र, बाजारासाठी ही चिंतेची बाब आहे की, बाजारात वाढ होऊनही इंडिया व्हिक्स 1.48 टक्क्यांच्या वाढीसह 18.47 वर बंद झाला आहे.

Share Market Today

कोणते शेअर्स तेजीत?

आजच्या व्यवहारात एनटीपीसी 2.80 टक्के, पॉवर ग्रिड 2.63 टक्के, एशियन पेंट्स 2.28 टक्के, आयटीसी 1.88 टक्के, भारती एअरटेल 1.76 टक्के, टाटा मोटर्स 1.62 टक्के वाढीसह बंद झाले. तर टीसीएस 1.62 टक्के, इन्फोसिस 0.95 टक्के, विप्रो 0.79 टक्के, एचडीएफसी बँक 0.74 टक्के घसरणीसह बंद झाले.

S&P BSE SENSEX

गुंतवणूकदारांनी 3.28 लाख कोटी कमावले

BSE वर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 10 मे रोजी वाढून 396.62 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या आधीच्या व्यापाराच्या दिवशी म्हणजे गुरुवारी 9 मे रोजी 393.34 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे बाजार भांडवल आज 3.28 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 3.28 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

कोणते शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर?

LTI Mindtree, Zee Entertainment, Tata Tech, Dalmia Bharat, Ramco Cement, Berger Paints आणि Asian Paints यांचे शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत.

जर आपण 52 आठवड्यांच्या उच्चांकावर असलेल्या शेअर्समध्ये हिंदुस्तान झिंक, कमर्शियल इंजिनीअरिंग, विजया डायग्नोस्टिक्स, हनीवेल, पॉलीकॅब इंडिया, ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स आणि ॲस्ट्रल पॉलिटेक या शेअर्सचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT