Share Market Latest Update Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; चौफेर खरेदीमुळे उत्साह, सेन्सेक्स 560 अंकांनी वधारला

Share Market Today: शेअर बाजारामध्ये आठवड्याची सुरुवात धडाक्यात झाली आहे. बाजारातील प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 560 अंकांनी वाढून 73,648 वर पोहोचला. निफ्टीने 189 अंकांची उसळी घेतली आणि 22,336 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 22 April 2024: शेअर बाजारामध्ये आठवड्याची सुरुवात धडाक्यात झाली आहे. बाजारातील प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 560 अंकांनी वाढून 73,648 वर पोहोचला. निफ्टीने 189 अंकांची उसळी घेतली आणि 22,336 वर बंद झाला. बाजारात चौफेर खरेदी बँकिंग, फार्मा आणि वाहन क्षेत्रात झाली.

Share Market Closing

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती 

बाजारात सर्वात जास्त वाढ कन्ज्युमर ड्युरेबलच्या शेअर्समध्ये दिसून आली आहे, ज्यामुळे निफ्टीच्या कन्ज्युमर ड्युरेबल निर्देशांकात 2.40 टक्क्यांची वाढ झाली आहे. याशिवाय एफएमसीजी, हेल्थकेअर, ऑइल अँड गॅस, एनर्जी, फार्मा, ऑटो, आयटी, बँकिंग क्षेत्रातील शेअर्सही तेजीसह बंद झाले.

Share Market Closing

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समधील खरेदीमुळे दोन्ही निर्देशांक वाढीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 44 शेअर्स वाढीसह बंद झाले तर केवळ 6 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 27 शेअर्स वाढीसह आणि 3 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

कोणते शेअर्स वाढले?

शेअर बाजारातील टॉप गेनर्समध्ये टाटा कंझ्युमर आणि बीपीसीएलचे शेअर्स तीन टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले, तर आयशर मोटर्स आणि लार्सन अँड टुब्रोचे शेअर्स सुमारे तीन टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. ॲक्सिस बँक 2.5 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. शेअर बाजारात घसरण झालेल्या शेअर्समध्ये एनटीपीसी, एचडीएफसी बँक, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज ऑटो, टाटा स्टील आणि इंडसइंड बँकेच्या शेअर्सचा समावेश होता.

S&P BSE SENSEX

कोणते शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर?

सोमवारच्या व्यवहारात जस्ट डायलसह व्होल्टास, मोतीलाल ओसवाल, हिंद कॉपर, सिमेन्स आणि जिओ फायनान्शियल सारख्या कंपन्यांचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. हिमाद्री स्पेशालिटीजचे शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहेत.

गुंतवणूकदारांनी 4.80 लाख कोटी कमावले

BSE वर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 22 एप्रिल रोजी वाढून 398.25 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे त्याच्या मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवार, 19 एप्रिल रोजी 393.45 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे बाजार भांडवल आज सुमारे 4.80 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 4.80 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Manifesto: विषय बदलले नाहीत, प्रश्न तेच.. आता आम्ही करू; असं म्हणत राज ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध, काय आहे खास?

IND vs AUS: ऋषभ पंतच्या बॉलिंगवर जसप्रीत बुमराहची फटकेबाजी! पाहा हा BCCI ने पोस्ट केलेला स्पेशल Video

१० पैकी १०! Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने डावात दहा बळी टिपले, Ranji Trophy त ३९ वर्षानंतर असे घडले

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

SCROLL FOR NEXT